मुसळधार पावसामुळे मुंबई खड्ड्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 01:14 AM2019-08-10T01:14:48+5:302019-08-10T01:15:07+5:30

जनतेचा आवाज ठरलेले संकेतस्थळ बंद; अ‍ॅपला नागरिकांचा अल्प प्रतिसाद

Due to heavy rains in Mumbai pits | मुसळधार पावसामुळे मुंबई खड्ड्यात

मुसळधार पावसामुळे मुंबई खड्ड्यात

Next

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक नाक्यांवरील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. खड्ड्यांच्या तक्रारींसाठी नागरिकांचा आवाज बनलेले संकेतस्थळ अद्यापही बंदच ठेवण्यात आले आहे. प्रभावी ठरलेल्या या संकेतस्थळाच्या बदल्यात आणलेल्या अ‍ॅपला मात्र नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही.

मुंबई खड्डेमुक्त करण्याचा निर्धार पालिकेने केला. परंतु प्रत्येक पावसाळ्यात मुंबई खड्ड्यात जाते. हे खड्डे तत्काळ दुरुस्त होतात का? यावर नजर ठेवणारे संकेतस्थळ पालिकेने २०११ मध्ये आणले. नागरिकांनाही आपल्या विभागातील खड्ड्यांचे छायाचित्र काढून टाकता येत असल्याने या संकेतस्थळाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र २०१५ मध्ये प्रशासनाने हे संकेतस्थळ बंद केले.

पालिका प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी हे संकेतस्थळ सुरू करण्याचा मानस व्यक्त केला होता. व्हॉइस आॅफ सिटिजन हे संकेतस्थळ तत्काळ सुरू करण्याची सूचनाही पालिकेने संबंधित कंपनीला केली. अद्यापही हे सॉफ्टवेअर सुरू करण्यात आलेले नाही. खड्ड्यांसाठी नेहमी पालिकेलाच टीकेचे धनी व्हावे लागते. या संकेतस्थळावर एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम खाते अशा अन्य प्राधिकरणाच्या खड्ड्यांचीही वेगळी नोंद ठेवली जात होती.

पालिकेचे पितळ उघडे
२०११ मध्ये व्हॉइस आॅफ सिटिजन हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. अल्पावधीतच या संकेतस्थळाला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र यामुळे पालिकेचे पितळ उघडे पडू लागले. अखेर २०१५ मध्ये हे संकेतस्थळ बंद करण्यात आले.
खड्ड्यांचे छायाचित्र काढून नागरिकांनी या संकेतस्थळावर टाकल्यानंतर रस्ते अभियंत्याला सूचना जात असे. अभियंता ठेकेदारामार्फत खड्डे बुजवून घेत असे. ४८ तासांच्या मुदतीत ठेकेदारांनी खड्डे न बुजविल्यास अभियंत्यालाही जबाबदार धरले जात होते.
टउॠट 247 हे अ‍ॅप पालिकेने तयार केला. मात्र या अ‍ॅपला त्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title: Due to heavy rains in Mumbai pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.