Join us

यंदा पाऊस जास्त झाल्याने हिवाळ्यात माथेरान, महाबळेश्वरचा फिल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 2:51 PM

Winter In Maharashtra : कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्र गारठणार

मुंबई : यंदा पाऊस जास्त झाल्याने कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्र लवकरच गारठणार असून, मुंबईचे किमान तापमान डिसेंबरपर्यंत १५ अंशाच्या खाली घसरणार आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांना घरबसल्या माथेरान आणि महाबळेश्वरचा फिल अनुभवता येणार आहे. तर २० डिसेंबरपासून थंडी आणखी वाढणार असून त्यावेळी बहुतांश ठिकाणी तापमान ५ अंशापेक्षा खाली घसरण्याची शक्यता आहे.

मुंबईबरोबरच पुण्याचा पारा देखील ७ अंशाखाली तर नागपूरचा पारा ५ अंशाखाली तर नाशिक जिल्ह्यामधील निफाडचे तापमान शून्य अंश सेल्सिअस गाठू शकेल. विदर्भ, मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर कोकण किनारपट्टी असा तापमान घसरण्याचा दर असेल. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे तापमानात सर्वात जास्त खाली येईल, असे हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, १२ नोव्हेंबर रोजी राज्यात काही ठिकाणी तापमान १० अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यातील कमाल तापमान, सामान्य तापमानापेक्षा किंचित कमी राहील. किमान तापमानात मात्र फार बदल होणार नाही. येत्या २ ते ३ दिवसांत राज्यात किमान तापमानात थोडी वाढ होईल. सरासरी किमान तापमान १५ अंश असेल. मुंबईचे किमान तापमान २० अंश राहील.

-----------------

राज्यातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये

जळगाव १०.७पुणे ९.८बारामती ११.९औरंगाबाद १२.८नाशिक १०.४परभणी १३चंद्रपूर ११.२यवतमाळ ११.५मुंबई १९.८ 

टॅग्स :हवामानमुंबईमाथेरानमहाबळेश्वर गिरीस्थान