धूलिकणांनी गाठला उच्चांक, हवेच्या गुणवत्तेत घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 05:28 AM2018-10-26T05:28:25+5:302018-10-26T05:28:32+5:30

दिवसेंदिवस मुंबई शहर आणि उपनगर धूरक्याच्या विळख्यात अडकत आहे.

Due to the high reach of dust, the quality of air falling | धूलिकणांनी गाठला उच्चांक, हवेच्या गुणवत्तेत घसरण

धूलिकणांनी गाठला उच्चांक, हवेच्या गुणवत्तेत घसरण

Next

मुंबई : दिवसेंदिवस मुंबई शहर आणि उपनगर धूरक्याच्या विळख्यात अडकत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता अशीच राहिली तर मुंबईची अवस्था दिल्लीसारखी होण्याची भीती आहे. पावसाळा संपल्यानंतर आणि आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण वाढले असून धूलिकणांनी उच्चांक गाठला आहे.
मागील दोन आठवड्यांपासून वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी आणि नवी मुंबई या भागातील हवेची गुणवत्ता घसरली असल्याचे ‘सफर’ संकेतस्थळावर नोंद केले आहे. गुरुवारी केलेल्या नोंदणीनुसार वांद्रे-कुर्ला संकुलात ३३०, अंधेरीत ३२१ आणि नवी मुंबईत ३०३ धूलिकणांची (पार्टिक्युलेट मॅटर) नोंद करण्यात आली आहे. शहर आणि उपनगरातील रिफायनरी, इमारतीचे बांधकाम, रस्त्याचे काम, दिवस-रात्र सुरू असलेली वाहतूक, विकासकामातील धूळ या कारणामुळे धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे. धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी बांधकाम क्षेत्रात पाण्याचा वापर केला पाहिजे. हवेत मिश्रित होणाऱ्या धूलिकणांवर पाण्याचा फवारा मारल्यास धूलिकण जमिनीवर स्थिर होतील.
>गुरुवारी नोंद झालेली हवेची गुणवत्ता, निर्देशांक
मथुरा रोड ४१३
धीरपूर ४०५
प्रितामपुरा ३८०
दिल्ली विद्यापीठ ३५६
एअरपोर्ट (टी३) ३५४
चांदणी चौक ३५१
गुरुग्राम ३४१
नोईडा ३१५
अयाननगर ३०६
पुसा २६७
लुधी रोड २४५
>मुंबई
वांद्रे-कुर्ला संकुल ३३०
अंधेरी ३२१
माझगाव २३९
बोरीवली १५१
कुलाबा १३४
मालाड ११६
वरळी ९८
भांडुप ९१
चेंबूर ७१
नवी मुंंबई ३०३
>धूलिकणांमुळे फुप्फुसे, हृदय यांच्यावर परिणाम होऊन फुप्फुसाचा दाह आणि हृदयविकार होण्याची भीती आहे. नवजात जन्म घेतलेल्या अर्भकावर धूलिकणांचा परिणाम होतो.
- दीपक हडवळे, आरोग्यतज्ज्ञ
>धूलिकणामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सतत खोकला, सर्दी, नाकातून पाणी येणे, ताप येणे, कफ होणे, श्वसनाची गती वाढणे, घसा खवखवणे यासारखे आजार होतात. या आजारामुळे अतिदक्षता विभागात दाखल होण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे धुळीच्या वातावरणात मास्क लावून काम करणे गरजेचे आहे. धूलिकणांच्या आजारामुळे दिवसेंदिवस दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढत आहे.
- डॉ. मनोज मस्के, श्वसनविकार तज्ज्ञ

Web Title: Due to the high reach of dust, the quality of air falling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.