मुंबई : दिवसेंदिवस मुंबई शहर आणि उपनगर धूरक्याच्या विळख्यात अडकत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता अशीच राहिली तर मुंबईची अवस्था दिल्लीसारखी होण्याची भीती आहे. पावसाळा संपल्यानंतर आणि आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण वाढले असून धूलिकणांनी उच्चांक गाठला आहे.मागील दोन आठवड्यांपासून वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी आणि नवी मुंबई या भागातील हवेची गुणवत्ता घसरली असल्याचे ‘सफर’ संकेतस्थळावर नोंद केले आहे. गुरुवारी केलेल्या नोंदणीनुसार वांद्रे-कुर्ला संकुलात ३३०, अंधेरीत ३२१ आणि नवी मुंबईत ३०३ धूलिकणांची (पार्टिक्युलेट मॅटर) नोंद करण्यात आली आहे. शहर आणि उपनगरातील रिफायनरी, इमारतीचे बांधकाम, रस्त्याचे काम, दिवस-रात्र सुरू असलेली वाहतूक, विकासकामातील धूळ या कारणामुळे धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे. धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी बांधकाम क्षेत्रात पाण्याचा वापर केला पाहिजे. हवेत मिश्रित होणाऱ्या धूलिकणांवर पाण्याचा फवारा मारल्यास धूलिकण जमिनीवर स्थिर होतील.>गुरुवारी नोंद झालेली हवेची गुणवत्ता, निर्देशांकमथुरा रोड ४१३धीरपूर ४०५प्रितामपुरा ३८०दिल्ली विद्यापीठ ३५६एअरपोर्ट (टी३) ३५४चांदणी चौक ३५१गुरुग्राम ३४१नोईडा ३१५अयाननगर ३०६पुसा २६७लुधी रोड २४५>मुंबईवांद्रे-कुर्ला संकुल ३३०अंधेरी ३२१माझगाव २३९बोरीवली १५१कुलाबा १३४मालाड ११६वरळी ९८भांडुप ९१चेंबूर ७१नवी मुंंबई ३०३>धूलिकणांमुळे फुप्फुसे, हृदय यांच्यावर परिणाम होऊन फुप्फुसाचा दाह आणि हृदयविकार होण्याची भीती आहे. नवजात जन्म घेतलेल्या अर्भकावर धूलिकणांचा परिणाम होतो.- दीपक हडवळे, आरोग्यतज्ज्ञ>धूलिकणामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सतत खोकला, सर्दी, नाकातून पाणी येणे, ताप येणे, कफ होणे, श्वसनाची गती वाढणे, घसा खवखवणे यासारखे आजार होतात. या आजारामुळे अतिदक्षता विभागात दाखल होण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे धुळीच्या वातावरणात मास्क लावून काम करणे गरजेचे आहे. धूलिकणांच्या आजारामुळे दिवसेंदिवस दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढत आहे.- डॉ. मनोज मस्के, श्वसनविकार तज्ज्ञ
धूलिकणांनी गाठला उच्चांक, हवेच्या गुणवत्तेत घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 5:28 AM