स्कोमीच्या अकार्यक्षमतेमुळे मोनोचा दुसरा टप्पा लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 06:08 AM2019-01-08T06:08:03+5:302019-01-08T06:08:34+5:30

डेडलाइन चुकणार : स्कोमीच्या चुका तत्काळ सुधारण्याचा प्राधिकरणाचा दावा

Due to the inefficiency of the SCO, the second stage of the mono prolongs | स्कोमीच्या अकार्यक्षमतेमुळे मोनोचा दुसरा टप्पा लांबणीवर

स्कोमीच्या अकार्यक्षमतेमुळे मोनोचा दुसरा टप्पा लांबणीवर

Next

अजय परचुरे 

मुंबई : मोनो रेलचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या ‘स्कोमी’ कंपनीची गच्छंती करून, मोनोची जबाबदारी ‘एमएमआरडीए’ने स्वत:च्या शिरावर घेतली, पण स्कोमीने व्यवस्थापन करताना दाखविलेल्या अकार्यक्षमतेचा फटका मोनोच्या दुसरा टप्पा सुरू होण्यावर पडणार आहे. परिणामी, वडाळा ते जेकब सर्कल हा बहुप्रतीक्षित मोनोरेलचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याची डेडलाइन चुकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत, पण स्कोमीने केलेल्या चुका तत्काळ सुधारत दुसरा टप्पा लवकरात लवकर सुरू करू, असा विश्वास एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी व्यक्त केला.

मोनोचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एमएमआरडीएला प्राधिकरणाला स्कोमीने करून ठेवलेल्या निष्काळजीपणाचा फटका बसत आहे. त्यामुळे वडाळा ते जेकब सर्कल हा मोनोरेलचा दुसरा टप्पा सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोनोच्या व्यवस्थापनावरून एमएमआरडीएशी झालेल्या संघर्षाची परिणिती स्कोमी या मलेशियन कंपनीच्या हकालपट्टीत झाली. स्कोमीने नियुक्त केलेला कर्मचारी वर्ग कायम ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतल्यामुळे या २०२ कर्मचाºयांच्या नोकरीचा प्रश्न मिटला, पण त्यांच्या वेतनाची जबाबदारी आता एमएमआरडीएवर येऊन पडली आहे. या कर्मचाºयांचा तब्बल सप्टेंबर महिन्यापासूनचे वेतन थकीत असून, कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न एमएमआरडीएला अग्रक्रमाने सोडवायचा आहे. मोनोचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी गाड्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मोनोच्या ताफ्यात सध्या १० गाड्या असून, फक्त सहा गाड्या प्रत्यक्ष सेवेत आहेत. अन्य गाड्या दुरुस्ती वा अन्य कारणास्तव यार्डातच आहेत. मोनोचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर, आणखी १० अतिरिक्त गाड्यांची गरज भासणार आहे. त्या पुरविण्याची जबाबदारी ‘स्कोमी’वर होती.

करारानुसार आॅक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांत प्रत्येकी दोन, तर डिसेंबर अखेरीस उर्वरित गाड्या पुरविणे गरजेचे होते, पण ‘स्कोमी’ने एकही गाडी पुरविलेली नाही. त्यामुळे एमएमआरडीएला नव्या गाड्या आपल्या ताफ्यात दाखल करणे, हे प्राधिकरणासमोर आव्हान असणार आहे. मात्र, नवीन गाड्यांविषयीच्या तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या असून, काही दिवसांतच याबद्दलच्या प्रक्रियेलाही सुरुवात होईल, असे कवठकर यांनी स्पष्ट केले आहे.

प्राधिकरणासमोर समस्यांचा डोंगर
स्कोमी कंपनीने एमएमआरडीएला गाड्यांच्या संदर्भात खरी माहितीही पुरविली नाही. त्यामुळे जेव्हा संपूर्ण व्यवस्थापन एमएमआरडीएने आपल्या हातात घेतले, तेव्हा गाड्यांच्या दुरुस्ती आणि गाड्यांची योग्य ती संख्या प्राधिकरणाच्या लक्षात आली.

च्त्याचबरोबर, मोनोच्या दुसºया टप्प्यांतील गाड्यांसाठी, त्यांतील स्पेअर पार्ट्ससाठी स्कोमीने जे कंत्राटदार निवडले होते. त्यांनी कामे तर सुरू केली. मात्र, स्कोमीने त्यांचे पैसे थकविल्याने ही कामेही खोळंबली आहेत.
च्एमएमआरडीएला या कोणत्याच गोष्टींची माहिती नसल्याने संपूर्ण प्रशासन हातात घेतल्यानंतर, या सर्व कंत्राटदाराची देणी, गाड्यांचे स्पेअर पार्ट्स आणि नवीन गाड्यांच्या दाखल करणे आदी कामे पूर्ण करण्याची आव्हान एमएमआरडीएसमोर आहे.

Web Title: Due to the inefficiency of the SCO, the second stage of the mono prolongs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.