रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; ३० जानेवारीपर्यंत कोयना एक्सप्रेससह अन्य ६ गाड्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 07:56 AM2020-01-21T07:56:25+5:302020-01-21T07:57:45+5:30

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातही रेल्वेकडून मंकी हिल येथे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आली होती. त्यावेळीही काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या

Due to infrastructure work on UP Southeast Ghat line between Monkey Hill and Karjat some trains have been cancelled | रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; ३० जानेवारीपर्यंत कोयना एक्सप्रेससह अन्य ६ गाड्या रद्द

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; ३० जानेवारीपर्यंत कोयना एक्सप्रेससह अन्य ६ गाड्या रद्द

Next

मुंबई : मध्य रेल्वेकडून मंकी हिल ते कर्जत या घाटक्षेत्रात विविध तांत्रिक तसेच देखभाल-दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत. ही कामे पुढील दहा दिवस सुरू राहणार असल्याने या कालावधीत अनेक एक्सप्रेससह इतर काही पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई-कोल्हापुर कोयना एक्सप्रेस पुण्यातूनच सोडण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातही रेल्वेकडून मंकी हिल येथे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आली होती. त्यावेळीही काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मुसळधार पावसामुळे घाट क्षेत्रातील रेल्वेमार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी भर पावसातच रेल्वेकडून दुरूस्तीची कामे करण्यात आली होती. पण या भागात आणखी काही कामे करणे आवश्यक असून पुढील दहा दिवस ही कामे सुरू राहणार आहेत. त्यामुळे मुंबई-कोल्हापुर कोयना एक्सप्रेस अंशत: रद्द करण्यात आली आहे. यांसह सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-भुसावळ-पुणे ही गाडी दि. २१ ते ३१ जानेवारी या कालावधीत दौंड-मनमाडमार्गे धावेल.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या
पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर ट्रेन ( २१ ते ३० जानेवारी)
सीएसएमटी-पंढरपूर पॅसेंजर (२३, २४, २५ आणि ३० जानेवारी)
पंढरपूर - सीएसएमटी पॅसेंजर ( २४, २५, २६ आणि ३१ जानेवारी)
सीएसएमटी-विजापूर पॅसेंजर ( २१, २२, २६ आणि २९ जानेवारी)
विजापूर-सीएसएमटी पॅसेंजर (२१ ते २३ आणि २७ ते ३० जानेवारी)
दौंड-साईनगर शिर्डी पॅसेंजर (२१ ते ३० जानेवारी) 

Web Title: Due to infrastructure work on UP Southeast Ghat line between Monkey Hill and Karjat some trains have been cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.