मुंबई : मध्य रेल्वेकडून मंकी हिल ते कर्जत या घाटक्षेत्रात विविध तांत्रिक तसेच देखभाल-दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत. ही कामे पुढील दहा दिवस सुरू राहणार असल्याने या कालावधीत अनेक एक्सप्रेससह इतर काही पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई-कोल्हापुर कोयना एक्सप्रेस पुण्यातूनच सोडण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातही रेल्वेकडून मंकी हिल येथे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आली होती. त्यावेळीही काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मुसळधार पावसामुळे घाट क्षेत्रातील रेल्वेमार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी भर पावसातच रेल्वेकडून दुरूस्तीची कामे करण्यात आली होती. पण या भागात आणखी काही कामे करणे आवश्यक असून पुढील दहा दिवस ही कामे सुरू राहणार आहेत. त्यामुळे मुंबई-कोल्हापुर कोयना एक्सप्रेस अंशत: रद्द करण्यात आली आहे. यांसह सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-भुसावळ-पुणे ही गाडी दि. २१ ते ३१ जानेवारी या कालावधीत दौंड-मनमाडमार्गे धावेल.
रद्द करण्यात आलेल्या गाड्यापनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर ट्रेन ( २१ ते ३० जानेवारी)सीएसएमटी-पंढरपूर पॅसेंजर (२३, २४, २५ आणि ३० जानेवारी)पंढरपूर - सीएसएमटी पॅसेंजर ( २४, २५, २६ आणि ३१ जानेवारी)सीएसएमटी-विजापूर पॅसेंजर ( २१, २२, २६ आणि २९ जानेवारी)विजापूर-सीएसएमटी पॅसेंजर (२१ ते २३ आणि २७ ते ३० जानेवारी)दौंड-साईनगर शिर्डी पॅसेंजर (२१ ते ३० जानेवारी)