मुंबई : अंधेरी (पूर्व) सहार पोलिस ठाण्यातील ३२ पुलिसकर्मी कोरोनाग्रस्त झाल्याने तेथे अपुरे मनुष्य बळ असल्यामुळे सुमारे १८७० स्थलांतरित मजूरांचे गावी जाण्यासाठी केलेले अर्ज कार्यवाही विना पडून आहेत. विलेपार्ले पूर्व विधानसभेचे भाजपा आमदार पराग अळवणी यानी केली आहे. सदर तक्रारी बाबत त्यांनी पोलिस आयुक्त व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांके लक्ष्य त्यानी एका पत्राद्वारे वेधले आहे.
३ मे पासून स्थलांतरित मजूरानी शासनाने आखलेल्या पद्धतिनुसार सहार पोलिस ठाण्याकडे अर्ज सादर करण्यास सुरवात केली असून आतापर्यंत सुमारे २००० अर्ज सादर झाले आहेत.मात्र यापैकी जेमतेम १३० अर्ज उपायुक्त,परिमंडळ आठ कड़े वर्ग झाले असून इतर सर्व अर्ज अद्याप सहार पोलिस ठाण्यातच पडून आहेत अशी माहिती आमदार अळवणी यानी दिली. सहार पोलिस ठाण्यातील या परिस्थिती बाबत आपण १३ मे रोजीच्या पत्राद्वारे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना अवगत करून अधिक मनुष्यबळ पाठवण्यात यावे अशी मागणी केली होती. मात्र तसे न झाल्याने सदर कामे प्रलंबित असून यामुळे मजूरांवर अन्याय होत आहे.आणि सदर बाब ही शासनाच्या धोरणास विसंगत आहे असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. स्थलांतरित मजूराना गावी जाता यावे यासाठी त्यांनी केलेले अर्ज तातडीने कार्यवाही व्हावी तसेच पुढील काळात अन्य कामे अडकून पडू नयेत यासाठी अधिक मनुष्य बळ उपलब्ध करण्यात यावे अशी विनंती आमदार अळवणी यांनी शेवटी केली आहे.