पुरेशा लस साठ्याअभावी आज अनेक ठिकाणी लसीकरण बंद, पालिका आणि सरकारी केंद्रात पुरवठा नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 07:42 AM2021-07-09T07:42:54+5:302021-07-09T07:44:55+5:30

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत ५९ लाख २९ हजार १९० नागरिकांनी लस घेतली आहे.

Due to lack of adequate vaccine stocks, vaccination is closed in many places today in mumbai | पुरेशा लस साठ्याअभावी आज अनेक ठिकाणी लसीकरण बंद, पालिका आणि सरकारी केंद्रात पुरवठा नाही 

पुरेशा लस साठ्याअभावी आज अनेक ठिकाणी लसीकरण बंद, पालिका आणि सरकारी केंद्रात पुरवठा नाही 

Next

मुंबई: केंद्राकडून अपेक्षित लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने मुंबईतील लसीकरण मोहीम पुन्हा थंडावली आहे. लसींचा साठा मर्यादित असल्याने गुरुवारी दिवसभरात केवळ ४५ हजार नागरिकांना लस मिळाली. सरकारी आणि पालिका केंद्रावर तर केवळ १५ हजार नागरिकांना डाेस मिळू शकले. तर अनेकांना डोस न घेताच घरी परतावे लागले. दरम्यान, लसींचा साठा शिल्लक नसल्याने शुक्रवारी लसीकरण मोहीम बंद राहणार आहे.

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत ५९ लाख २९ हजार १९० नागरिकांनी लस घेतली आहे. गेले काही दिवस लसींचा साठा सुरळीत सुरू असल्याने दररोज सरासरी एक लाखाहून अधिक नागरिकांना लस मिळत होती; मात्र या आठवड्यात केंद्राकडून मर्यादित साठा उपलब्ध झाल्यामुळे लसीकरण मोहीम थंडावली आहे. गुरुवारी काही मोजक्याच पालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात आले.



गुरुवारी महापालिकेच्या २८३ केंद्रांवर जेमतेम १४ हजार लोकांना लस देण्यात आली. तर खासगी लसीकरण केंद्रांमध्ये २८ हजार लोकांना लस देण्यात आली. सरकारच्या २० केंद्रांमध्ये १६०० लोकांना लस देण्यात आली. म्हणजेच एकूण ४५ हजार लोकांना लस देण्यात आली; मात्र पुढील दोन दिवस लस येण्याची शक्यताही कमी आहे. जेव्हा लस उपलब्ध होईल तेव्हाच लसीकरण मोहीम सुरू होईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 

Web Title: Due to lack of adequate vaccine stocks, vaccination is closed in many places today in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.