मर्यादीत लससाठ्यामुळे आज ७३ केंद्रांवरच लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:08 AM2021-09-21T04:08:21+5:302021-09-21T04:08:21+5:30
मुंबई : कोविड प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबईत सध्या मर्यादित प्रमाणात लससाठा उपलब्ध आहे. त्यामुळे ३१६ पैकी ७३ निवडक पालिका ...
मुंबई : कोविड प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबईत सध्या मर्यादित प्रमाणात लससाठा उपलब्ध आहे. त्यामुळे ३१६ पैकी ७३ निवडक पालिका आणि शासकीय केंद्रांवर मंगळवारी लसीकरण सुरू राहणार आहे. लसींचा अतिरिक्त साठा उपलब्ध झाल्यानंतर बुधवारपासून ही मोहीम पूर्ववत होणार आहेे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १८ वर्षांवरील ९५ लाख लाभार्थ्यांपैकी एक कोटी ११ लाख ७१ हजार १८० नागरिकांनी लस घेतली आहे. यापैकी ७७ लाख ३२ हजार १२५ नागरिकांनी पहिला डोस, तर ३४ लाख ३९ हजार ५५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. मात्र सोमवारी लसींचा साठा कमी शिल्लक राहिल्याने मंगळवारी केवळ ७३ केंद्रांवर लस मिळणार आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री उशिरापर्यंत महापालिका प्रशासनाला लससाठा उपलब्ध होणार आहे. या साठ्याचे वितरण मंगळवारी विविध शासकीय व महापालिका केंद्रांना करण्यात येईल. त्यामुळे बुधवार, दिनांक २२ सप्टेंबरपासून सर्व ३१६ केंद्रांवर लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.