मलिद्यामुळेच कारवाईची धार बोथट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:16 AM2018-05-26T03:16:10+5:302018-05-26T03:16:10+5:30

दादर मंडईतील अतिक्रमण : पालिका, पोलिसांना मिळतात ‘हफ्ते’; व्यापाऱ्यांचा आरोप

Due to Malidas, the motions of action were dull | मलिद्यामुळेच कारवाईची धार बोथट

मलिद्यामुळेच कारवाईची धार बोथट

googlenewsNext

मुंबई : दादरच्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडईसमोर अनधिकृतपणे व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांना न हटवण्यामागे मुंबई महापालिकाच आहे, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘लोकमत’ने या अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्याची बातमी लावून धरल्यावर महापालिकेने १ दिवसाच्या कारवाईचा दिखावा केला. मात्र दुसºया दिवसापासून परिस्थिती जैसे थेच बनली. या फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणावर मलिदा मिळत असल्यानेच पालिका अधिकारी आणि पोलीस कारवाई करीत नाहीत, असा आरोप क्रांतिसिंह नाना पाटील मंडईत अधिकृतपणे व्यवसाय करणाºया ३२५ व्यापाºयांनी केला आहे.
व्यापाºयांच्या म्हणण्यानुसार, दादरसारख्या वर्दळीच्या परिसरात अनधिकृत व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांकडून दरमहा ‘हफ्ते’ (विशिष्ट रक्कम) महापालिकेच्या जी नॉर्थ वॉर्ड विभागातील अधिकाºयांना आणि शिवाजी पार्क पोलिसांना मिळते. ही रक्कम काही लाखांत आहे.
अतिक्रमण केलेल्या या फेरीवाल्यांना त्या जागेवरून हटवल्यास लाखो रुपयांच्या मलिद्यावर महापालिकेला आणि पोलिसांना पाणी सोडावे लागेल, यामुळेच पालिकेचे अधिकारी, अतिक्रमण विभाग कारवाई करत नाही, असा आरोप या व्यापाºयांनी केला आहे.

ही तर सेटिंग
पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत दादर मंडईत सुमारे २०० हून अधिक फेरीवाले अनधिकृतपणे आपला व्यवसाय करतात. जी नॉर्थ विभागाचे साहाय्यक आयुक्त आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी ५ ते ८ या वेळेत येथे कधीच फिरकत नाहीत. मात्र, सकाळी ८ नंतर महापालिकेची गाडी या भागात उभी असते. पालिकाअधिकारी आणि अनधिकृत फेरीवाल्यांची ही ‘सेटिंग’ असल्याचा आरोप क्रांतिसिंह नाना पाटील मंडईतील व्यापाºयांनी केला आहे.

सरकारने सीसीटीव्हीचे कनेक्शन कापले
एल्फिस्टन दुर्घटनेनंतर या अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. रेल्वे स्थानकाला लागून १५० मीटरच्या परिसरात बसण्यास उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांना मज्जाव केला. मनसेने फेरीवाल्यांविरोेधात ‘खळ्ळखट्याक’चा पवित्रा घेतल्यानंतर फेरीवाल्यांच्या विळख्यातून दादर परिसर मुक्त झाला होता. मी माझ्या नगरसेवक निधीतून या परिसरात २३ सीसीटीव्ही कॅमेरेही उभारले होते. सीसीटीव्हीमधून या अनधिकृत फेरीवाल्यांवर नजर ठेवून कारवाईही केली जात होती. मात्र, राज्य सरकारने आपल्या मालकीचे सीसीटीव्ही कॅमेरे या परिसरात बसवल्यानंतर मनसेने बसवलेल्या २३ सीसीटीव्ही कॅमेºयांचे कनेक्शन बंद केले. हे कनेक्शन बंद करून राज्य सरकारला नेमके काय साधायचे होते, हे सरळसरळ स्पष्ट होत आहे. महापालिकेची या फेरीवाल्यांवर कारवाई न करण्याची मानसिकताही यातून दिसून येते. - संदीप देशपांडे, प्रवक्ता, मनसे.

Web Title: Due to Malidas, the motions of action were dull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.