अंधेरीतल्या मरोळ येथील घरांना मेट्रोच्या कामामुळे हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:46 AM2017-10-26T01:46:27+5:302017-10-26T01:46:41+5:30

मुंबई : अंधेरी येथील मरोळ भागात कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३च्या कामांमुळे स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मेट्रोच्या बोगद्याचे काम सध्या सुरू आहे.

Due to Metro work in the dark areas of Marol, | अंधेरीतल्या मरोळ येथील घरांना मेट्रोच्या कामामुळे हादरे

अंधेरीतल्या मरोळ येथील घरांना मेट्रोच्या कामामुळे हादरे

Next


मुंबई : अंधेरी येथील मरोळ भागात कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३च्या कामांमुळे स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मेट्रोच्या बोगद्याचे काम सध्या सुरू आहे. या कामामुळे दिवसभर मोठा आवाज होत असतो. परंतु खोदकामादरम्यान केल्या जाणाºया स्फोटांमुळे आसपासच्या परिसरातील घरांना हादरे बसत आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेकदा स्फोटांमुळे घरातील वस्तू जागेवरून
इतरत्र सरकतात, असे स्थानिकांनी सांगितले.
मरोळमध्ये मेट्रो-३चे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम सुरू असून, दररोज दोन-तीन वेळा स्फोट केले जातात. या स्फोटांमुळे घरांना हादरे बसत असून, घरातील भांडी वाजतात, पडतात. घरातील वस्तू जागेवरून हलतात. काही लोकांच्या घरातील भिंतींना लहान भेगा पडल्या आहेत, अशी माहिती मरोळमधील रहिवासी गॉडफ्रे पिमेंटा यांनी दिली. रात्री १०नंतर खोदकाम बंद केले जाते. परंतु दिवसभर केलेल्या खोदकामामुळे निघालेले डेब्रिज ट्रकमध्ये भरण्याचे काम सुरू असते. तेव्हा जेसीबी आणि ट्रकचा आवाज, डेब्रिज भरतानाचा आवाज रात्रभर सुरू असतो. दिवसभर खोदकामामुळे आणि रात्री डेब्रिज भरण्याच्या कामामुळे रहिवाशांना नीट झोपता येत नाही.
दरम्यान, मेट्रोच्या कामामुळे होणाºया त्रासाला कंटाळून मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर दूरध्वनी करून तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मरोळमध्ये काम करणाºया अधिकाºयांना पोलीस ठाण्यात नेले. मात्र काय कार्यवाही झाली; याची काहीच माहिती मिळाली नाही, असे पिमेंटा यांनी सांगितले.

Web Title: Due to Metro work in the dark areas of Marol,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो