स्थलांतराकडे दुर्लक्ष केल्याने माहुलवासीयांची काळी दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 05:44 AM2018-11-07T05:44:27+5:302018-11-07T05:45:41+5:30
माहुल येथील प्रकल्पग्रस्तांच्या स्थलांतराच्या मागणीकडे सरकारला लक्ष देण्यास वेळ नसल्याने माहुलकरांनी काळी दिवाळी साजरी करत सरकारचे लक्ष वेधले.
मुंबई - माहुल येथील प्रकल्पग्रस्तांच्या स्थलांतराच्या मागणीकडे सरकारला लक्ष देण्यास वेळ नसल्याने माहुलकरांनी काळी दिवाळी साजरी करत सरकारचे लक्ष वेधले.
विद्याविहार येथील तानसा पाइपलाइन आणि माहुल येथे माहुलकरांनी काळी दिवाळी साजरी केली असून, सरकार आमच्या स्थलांतराच्या मागणीकडे लक्ष कधी देणार, असा सवाल त्यांनी केला आहे.
जलवाहिनीच्या रुंदीकरणाच्या कामामुळे विविध ठिकाणांवरील प्रकल्पग्रस्तांना प्रशासनाने माहुल येथे पुनर्वसित केले आहे. मात्र मागील दीड वर्षापासून माहुल येथे पुनर्वसित झालेल्या माहुलवासीयांना प्रदूषणाने घेरले असून, आजारांना सामोरे जावे लागत आहे. प्रकल्पग्रस्त आंदोलक यापूर्वी जेथे वास्तव्यास होते; तेथील लोकप्रतिनिधींची भेट घेत म्हणणे मांडले. आंदोलनही केले. प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींकडून आंदोलनकर्त्यांना आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. परिणामी आंदोलनाचा भडका उडाला असून, माहुलवासीयांनी विद्याविहार, तानसा पाइपलाइन येथे आंदोलन छेडले आहे. विशेषत: आजाराचा धोका वाढत आहे. अबालवृद्धही आंदोलनात सामील होत आहेत. गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्याकडेही त्यांनी न्याय मागितला आहे.