धरणाचे दरवाजे उघडल्याने पूरस्थिती

By admin | Published: July 31, 2014 12:17 AM2014-07-31T00:17:09+5:302014-07-31T00:17:09+5:30

डहाणू तालुक्यातील सूर्या नदीला धरणाचे दरवाजे उघडल्याने नदी परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने पोलिसांकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला होता.

Due to the opening of the dam's door, flooding | धरणाचे दरवाजे उघडल्याने पूरस्थिती

धरणाचे दरवाजे उघडल्याने पूरस्थिती

Next

कासा : डहाणू तालुक्यातील सूर्या नदीला धरणाचे दरवाजे उघडल्याने नदी परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने पोलिसांकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला होता.
डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्यातील गावांना उन्हाळ्यात शेतीला कालव्यातून पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या नदीवरील धामणी धरण भरल्याने सकाळी धामणी धरणातून सुमारे १५ हजार क्युसेक एवढे पाणी धरणाचे दरवाजे उघडून सोडण्यात आले. त्यामुळे सूर्या नदी आजूबाजूच्या गावांना पूरस्थिती निर्माण झाली होती. गेल्या चार दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने धामणी धरण भरले आहे. तर धामणी धरणाच्या खाली पाणी अडवून शेतीला पाणीपुरवठा करणारे कवडास बंधारा ओसंडून वाहत आहे.
सततच्या पावसामुळे कासा भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली असून खेड्यापाड्यातील नदी नाले भरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. तर वारा पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याने रस्ते बंद पडले होते. एकंदरच या पूरस्थितीमुळे नागरिक चिंतेत आहे.

Web Title: Due to the opening of the dam's door, flooding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.