ठाण्याजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने म.रे. विस्कळीत

By admin | Published: May 22, 2015 10:52 AM2015-05-22T10:52:30+5:302015-05-22T12:52:20+5:30

ठाणे स्थाकाजवळ लोकलची ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Due to overhead wire breaking in Thane, Disorganized | ठाण्याजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने म.रे. विस्कळीत

ठाण्याजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने म.रे. विस्कळीत

Next

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. २२ - ठाणे स्थाकाजवळ लोकलची ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.  सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे ठाणे- कल्याण दरम्यान स्लो मार्गावरील अप व डाऊन दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. ठाणे स्थानकातील हा बिघाड दुरूस्त झाल्यानंतर सीेएसटीकडे जाणारी धिम्या मार्गावरील वाहतूक सुरू झाली खरी मात्र गाड्या अद्याप सुमारे अर्धा तास उशीरानेच धावत आहेत तर कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक अद्याप ठप्पच आहे. 
सकाळी दहाच्या सुमारास ठाण्याजवळ लोकलची ओव्हरहेड वायर तुटली. तो बिघाड दुरूस्त करत असतानाच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ठाणे स्थानकातील १ ते ४ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरील रेल्वेसेवाही पूर्णपणे ठप्प झाली. ऐन सकाळच्या वेळेस हा गोंधळ झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आणि प्लॅटफॉर्म व रेल्वे ट्रॅक्सवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यामुळे चाकरमान्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. कल्याणच्या दिशेने जाणारी धिम्या मार्गावरील मुलुंडला जलद मार्गावर आणि मुंबईच्या दिशेने जाणा-या गाड्या दिव्यावरून जलद मार्गावर वळवण्यात आल्याची माहित मिळत आहे.
 

Web Title: Due to overhead wire breaking in Thane, Disorganized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.