मतांच्या लोभामुळे करवाढीची शक्यता कमीच!

By admin | Published: February 3, 2016 03:47 AM2016-02-03T03:47:59+5:302016-02-03T03:47:59+5:30

दरवर्षी कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३६ हजार कोटी रुपयांचा आकडा पार करण्याची शक्यता आहे़ आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याने सन

Due to the popularity of votes, the burden of the tax hike | मतांच्या लोभामुळे करवाढीची शक्यता कमीच!

मतांच्या लोभामुळे करवाढीची शक्यता कमीच!

Next

मुंबई : दरवर्षी कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३६ हजार कोटी रुपयांचा आकडा पार करण्याची शक्यता आहे़ आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याने सन २०१६ - २०१७च्या अर्थसंकल्पात कोस्टल रोड, गारगाई पिंजाळ जलप्रकल्पांना गती आणि स्मार्ट सिटी व आॅनलाइन आरोग्य सेवा या नवीन प्रकल्पांची घोषणा होऊ शकते. मात्र नालेसफाई आणि रस्ते विभागातील घोटाळ्यानंतर या विभागांच्या तरतुदीमध्ये कपात केली जाण्याची शक्यता आहे.
सन २०१६-२०१७चा अर्थसंकल्प पालिका आयुक्त अजय मेहता बुधवारी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांना सादर करतील़ निवडणुकीचे वर्ष असल्याने तसेच पाणी, मलनिस्सारण, परवाना या करांमध्ये दरवर्षीच वाढ आधीच मंजूर असल्याने नवीन करवाढ होण्याची शक्यता नाही़ मात्र मुंबईला स्मार्ट सिटी बनवण्यास लोअर परळ विभागाला बिझनेस हब जाहीर करून त्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)गारगाई पिंजाळ, दमणगंगा अशा जलप्रकल्पांना गती देण्यात येणार आहे़ त्याचबरोबर कोस्टल रोडसाठी भरीव तरतूद, मुलुंड गोरेगाव जोड रस्ता हे जुनेच प्रकल्प मार्गी लावण्यावर पालिकेचा भर असणार आहे़
पर्यटन नगरी... मुंबईत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षणीय स्थळांच्या स्वच्छतेची घोषणा गेल्या वर्षी पालिकेने केली़ त्यानुसार आता मुंबईला पर्यटन नगरी बनविण्यासाठी आठवडा बाजार ही संकल्पना राबविण्यात येणार आहे़

Web Title: Due to the popularity of votes, the burden of the tax hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.