मुंबई : मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचू लागला आहे. भाजपने कुर्ला येथे एससी-एसटी मेळावा घेतला तर काँग्रेसनेसंजय दत्तला प्रचारात उतरवले. त्यामुळे उत्तर मध्य मतदारसंघात प्रचाराचा वेग वाढल्याचे चित्र सोमवारी दिसून आले.काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी त्यांचा भाऊ अभिनेता संजय दत्त याने मतदारसंघात रॅली काढली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी दत्त याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळी रिझवी पार्क येथून सुरू झालेली ही मिरवणूक दौलतनगर, इंदिरानगर, कार्टर रोड, लिंकिंग रोड, खार टेलिफोन एक्सचेंज, एस.व्ही. रोड, पारसी कॉलनी, वांद्रे स्थानक, लीलावती रुग्णालय, मेहबूब स्टुडिओ, हिल रोड, सेंट अॅण्ड्र्युस चर्च पेरी क्रॉस रोड येथून ओटर्स क्लब येथे समाप्त झाली. संजय दत्त प्रचारात सहभागी झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे भरते आले असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले. प्रिया दत्त यांच्या प्रचारामध्ये संजय दत्तच्या सक्रिय सहभागाचा चांगला लाभ होईल, अशी आशा माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी व्यक्त केली. प्रिया यांनी खासदार असताना केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून मतदार पुन्हा प्रिया यांच्याकडे वळतील व त्यांचा विजय होईल, असे मत सिद्दीकी यांनी व्यक्त केले. आमदार विजय भाई गिरकर, शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर, रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी मार्गदर्शन केले. समस्या सोडविण्यासाठी पक्षाने अनेक निर्णय घेतले असून इतर प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी पूनम महाजन कार्यरत राहतील, असे आश्वासन या वेळी देण्यात आले.राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मानसन्मान मिळत नसल्याने नाराजीचा सूरकॉंग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या प्रचारादरम्यान पुरेसा मानसन्मान मिळत नसल्याने व डावलले जात असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दत्त यांच्या प्रचारावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दत्त यांच्यासमोरील अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे.संजय दत्त यांच्या प्रचार रॅली दरम्यान राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रमुख पदाधिकाºयांना पुरेसे महत्त्व देण्यात आले नाही. कॉंग्रेसचे या ठिकाणी प्रचार प्रमुख असलेले माजी आमदार बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादीला दुलर्क्षित करण्याची भूमिका घेतात, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे. सोमवारी दत्त यांच्या रॅलीवेळी राष्ट्रवादीला कस्पटासमान वागणूक देण्यात आली त्यामुळे आम्ही वांद्रे तालुक्यात त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई सचिव आसिफ भामला यांनी दिली.माजी तालुकाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी देखील कॉंग्रेसकडून पुरेसे महत्त्व व सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याचा आरोप केला.
संजय दत्त यांच्या प्रचार रॅलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 1:59 AM