Join us

पावसामुळे रस्त्यांची चाळण, मुंबईकरांना सहन करावा लागतोय खड्ड्यांचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 3:01 AM

सलग चार दिवस पावसाने झोडपून काढल्यानंतर आता मुंबईकरांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे. चार दिवसांच्या पावसानंतर मुंबई शहरासह उपनगरांतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.

मुंबई  - सलग चार दिवस पावसाने झोडपून काढल्यानंतर आता मुंबईकरांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे. चार दिवसांच्या पावसानंतर मुंबई शहरासह उपनगरांतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मुंबई विद्यापीठापासून सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाचा परिसरही खड्ड्यांनी भरला असून, मुंबईत रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मोहम्मद अली मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पश्चिम द्रुतगती मार्ग अशा प्रमुख मार्गांवर खड्डे पडल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. विशेष म्हणजे रुग्णालय, शाळा, न्यायालय, विद्यापीठ, उद्यान अशा वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणांसमोरही खड्डे आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने खड्डे असल्याने वाहतुकीलाही ब्रेक लागणार आहे. एकंदरीतच खड्ड्यांचे प्रमाण पाहता रस्त्यांच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खड्डे पडलेले काही रस्ते तर मे आणि जून महिन्यात तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अवघ्या दीड महिन्यात रस्त्यांवर खड्डे पडल्याने मुंबईकरांच्या कराचा पैसा खड्ड्यात गेल्याची भावना व्यक्त होत आहे.न्यायालय दखल घेणार का?मुंबईच्या रस्त्यांची चाळण झालेली असताना विरोधी पक्षही मूग गिळून गप्प आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील नगरसेवकांच्या प्रभागांमधील रस्त्यांवर खड्डे आहेत.त्यामुळे न्यायप्रविष्ट असलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नांवर न्यायालय आता तरी मुंबईकरांना दिलासा देणार का, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.या ठिकाणीआहेत खड्डे!मुंबई सत्र न्यायालयमुंबई विद्यापीठ (फोर्ट संकुल)मुंबई उच्च न्यायालयक्रॉफर्ड मार्केटजे.जे. मार्ग (जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यासमोर)लोअर परळकमलामिल कंपाउंडसमोरगणपतराव कदम मार्ग (वरळी)ई.एस. पाटणवाला मार्ग (भायखळा)वीर तानाजी मालुसरे मार्ग (कॉटनग्रीन)संत रोहिदास चौक (परळ एसटी आगार)विलेपार्लेपेनिनसुला पार्कसमोर

टॅग्स :मुंबईरस्ते वाहतूकखड्डे