पावसामुळे मुंबईतल्या धुळीकणांचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 05:25 AM2018-06-12T05:25:36+5:302018-06-12T05:25:36+5:30

मान्सून सुरू झाल्यामुळे वातावरणातील धुळीकणांचे (पार्टीक्युलेट मॅटरचे) प्रमाण कमी झाले आहे. मुंबईमधील धूर आणि धुके यांच्या मिश्रणाने धुरक्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा वाढल्यामुळे मुंबईकरांना श्वसन आणि त्वचा विकारांना सामोरे जावे लागत होते.

Due to the rains, the number of dust particles in Mumbai decreased | पावसामुळे मुंबईतल्या धुळीकणांचे प्रमाण घटले

पावसामुळे मुंबईतल्या धुळीकणांचे प्रमाण घटले

googlenewsNext

मुंबई : मान्सून सुरू झाल्यामुळे वातावरणातील धुळीकणांचे (पार्टीक्युलेट मॅटरचे) प्रमाण कमी झाले आहे. मुंबईमधील धूर आणि धुके यांच्या मिश्रणाने धुरक्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा वाढल्यामुळे मुंबईकरांना श्वसन आणि त्वचा विकारांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे दिल्लीसारखी अवस्था मुंबईची होणार होती.
मात्र वादळी वारा आणि पाऊस पडल्यामुळे प्रदूषणरहित धुळीकणांची संख्या घटली आहे. ‘सफर’ संकेतस्थळांवर हवेच्या गुणवत्तेमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे निदर्शनास येत आहे. पर्यावरणतज्ज्ञांकडून सांगण्यात
आले आहे की, मुंबईमधील सद्य:स्थितीतील वातावरण उत्तम आहे. दरम्यान, वातावरणातील आल्हाददायक स्थिती फक्त जून ते आॅक्टोबरपर्यंत पाऊस असेपर्यंत राहणार आहे. त्यानंतर पुन्हा वातावरणात धुळीकणांचे प्रमाण वाढण्याची शक्यता पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
पावसाळ्याआधी मुंबईतील धुळीकणांचे प्रमाण मर्यादेपेक्षा वाढले होते. मागील महिन्यात वातावरणातील पारा विस्कळीत झाल्याने दुपारी ऊन व रात्री बोचऱ्या थंडीला मुंबईकरांना सामोरे जावे लागत होते. मुंबईत रात्रंदिवस सुरू असलेली वाहतूक, बांधकामे, विकासात्मक प्रकल्पातून केली जाणारी खोदकामे, सफाईअभावी वाढणारी धूळ या कारणांमुळे धुळीकणांचे प्रमाण वाढले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या हवा प्रदूषणाच्या अहवालात मुंबई चौथ्या स्थानावर पोहोचली. हवेतील घसरलेल्या गुणवत्तेमुळे मुंबई धुरक्याच्या विळख्यात सापडली होती. मात्र शहर आणि उपनगरात मान्सून सुरू झाल्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारली असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांनी सांगितले आहे.
सफरचे प्रकल्प संचालक
गुफरान बेंग यांनी सांगितले की, मुंबईमधील सध्याचे वातावरण समाधानकारक आहे. पाऊस पडल्यामुळे वातावरणातील
हवेतील धुळीकणांचे (पीएम) प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मुंबईतील हवेचे शुद्धीकरण झाले आहे.
समुद्री वारे वाहत असल्यामुळेदेखील हवेतील धुळीकणांचे प्रमाण कमी झाले आहे.

सध्या पाऊस पडत असल्यामुळे वातावरणातील धुळीकणांचे प्रमाण घटले आहे. मात्र पाऊस थांबल्यावर याच धुळीकणांचे प्रमाण वाढेल. रस्त्यावरील धूळ, बांधकाम आणि खोदकाम यामुळे निर्माण होणारी धूळ सध्या पावसामुळे वातावरणात मिसळत नाही.
- गिरीश राऊत, पर्यावरणतज्ज्ञ

पावसामुळे वातावरणात ओलावा निर्माण झाल्याने धुळीकणांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र मुंबईतील प्रदूषणाची स्थिती तशीच आहे. अनेक भागांतील धुळीकणांचे प्रमाण संकेतस्थळावर दाखवण्यात येत नाही. काही संकेतस्थळे वातावरणातील हवेची गुणवत्ता चुकीच्या पद्धतीने दाखवते. त्यामुळे मुंबईचे खरे वातावरण समजण्यास कठीण होते.
- गॉडफे्र पिमेंटा, विश्वस्त, वॉचडॉग फाउंडेशन

मुंबईतील खोदकाम, बांधकाम बंद झाल्यामुळे धुळीचे प्रमाण कमी झाले आहे. पाऊस पडल्यामुळे हवेतील धुळीकण जमिनीवर स्थिरावले आहेत. मुंबईत जोपर्यंत पावसाचा मौसम आहे तोपर्यंत वातावरणातील पीएमचे प्रमाण असेल.
- डी. स्टॅलिन, प्रकल्प संचालक, वनशक्ती

Web Title: Due to the rains, the number of dust particles in Mumbai decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.