अरे व्वा़ मुंबईच्या कचºयात झाली घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 06:59 AM2017-08-07T06:59:26+5:302017-08-07T06:59:26+5:30

मुंबईवर कचऱ्याचा भार वाढत असताना, कचराभूमीचा पर्यायही उरलेला नाही. यामुळे स्वच्छता अभियानातही मुंबईला मार खावा लागल्याने, सुका व ओला कचरा वर्गीकरणाची कडक अंमलबजावणी करण्यात आली.

 Due to the reduction in Mumbai's waste | अरे व्वा़ मुंबईच्या कचºयात झाली घट

अरे व्वा़ मुंबईच्या कचºयात झाली घट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईवर कचऱ्याचा भार वाढत असताना, कचराभूमीचा पर्यायही उरलेला नाही. यामुळे स्वच्छता अभियानातही मुंबईला मार खावा लागल्याने, सुका व ओला कचरा वर्गीकरणाची कडक अंमलबजावणी करण्यात आली. परिणामी, या शहरातील कचºयाचा भार ११०० मेट्रिक टन कमी झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
गेल्या वर्षी दररोज सरासरी नऊ हजार मेट्रिक टन कचरा उचलण्यात येत होता. मुंबईतील लोकसंख्येच्या बरोबरीने कचºयाचा ढीगही वाढत आहे. त्याच वेळी देवनार, मुलुंड कचराभूमीची कमाल मर्यादा संपली आहे, तर कांजूर मार्ग कचराभूमी वादातच अडकलेली आहे.
त्यामुळे कचºयावर पुनर्प्रक्रिया हाच पालिकेपुढचा अंतिम पर्याय ठरला आहे. त्यानुसार, गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या आवारातच कचºयावर प्रक्रिया करण्याची सक्ती करण्यात आली.
या मोहिमेला यश येऊन कचरा वर्गीकरण व प्रक्रियेमुळे, पालिकेला आता दररोज सरासरी सात हजार ९०० मेट्रिक टन एवढाच कचरा उचलावा लागत आहे. म्हणजेच कचºयाचा भार दररोज सरासरी ११०० मेट्रिक टन कमी होणार आहे. त्याचबरोबरीने एकूण ५० कचरा वर्गीकरण केंद्र तयार होत असल्याने, दररोजच्या कचºयात सुमारे ६०० मेट्रिक टनांची घट होईल, असा अंदाज पालिका अधिकाºयाने व्यक्त केला आहे.

खर्चातही बचत
महापालिकेच्या दैनंदिन कचरा संकलनामध्ये एकूण तीन हजार ४५ टन एवढी घट होणे अपेक्षित आहे. यापैकी दररोज ११०० मेट्रिक टनांची घट सध्या झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. या सर्व उपाययोजनांमुळे कचरा वहन खर्चामध्ये २५ टक्क्यांची घट होणार आहे.

पुनर्प्रक्रिया केंद्रांचा पर्याय
सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात १२ ठिकाणी कचरा वर्गीकरण केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहेत. यासाठी विकास नियोजन आराखड्यात राखीव असलेले १२ भूखंड महापालिकेच्या ताब्यात आले आहेत. यावर कचरा वर्गीकरण केंद्रे उभारली जाणार आहेत. या प्रस्तावित १२ वर्गीकरण केंद्रांमुळे व सध्या अस्तित्वात असलेल्या ३८ कचरा वर्गीकरण केंद्रांमुळे कचºयाचे प्रमाण आणखी सहाशे मेट्रिक टनने घटणार आहे.

यांना आहे कचरा पुनर्प्रक्रियाची सक्ती
एकूण चटई क्षेत्र २० हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या गृहनिर्माण संकुलांनी, आपापल्या परिसरात निर्माण होणाºया ओल्या कचºयाची विल्हेवाट तिथेच करण्याची सक्ती करण्यात आली आहे. कचरा वर्गीकरण यासारख्या उपाययोजना आपल्या स्तरावर राबवून कचºयाचे प्रमाण शक्य तेवढे कमी करण्यास बजाविण्यात आले आहे.

अशी होईल कचºयात घट
आतापर्यंत तीन हजार ८४ गृहनिर्माण संकुल व आस्थापनांना पालिकेने नोटिशी दिल्या आहेत. या संकुलांमधून दररोज सुमारे एक हजार ३४५ मेट्रिक टन एवढा कचरा सध्या गोळा करण्यात येत आहे. मात्र, २ आॅक्टोबर २०१७ पासून संबंधित संकुलांमधील कचरा संकलन कमी होणार असल्याने, महापालिकेच्या एकूण दैनंदिन कचरा संकलनात घट होणार आहे.

Web Title:  Due to the reduction in Mumbai's waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.