तणावामुळे निवासी डॉक्टर मानसिक आजाराचे बळी

By admin | Published: August 9, 2015 02:50 AM2015-08-09T02:50:09+5:302015-08-09T02:50:09+5:30

एमबीबीएस पूर्ण केल्यावर पदव्युत्तर शिक्षण घेताना डॉक्टरांना अभ्यासाच्या बरोबरीनेच बाह्यरुग्ण विभाग पाहणे, रुग्णांवर उपचार करणे हे सर्व अभ्यासाचा एक भाग म्हणून पाहावे लागते.

Due to stress, the resident doctor is a victim of mental illness | तणावामुळे निवासी डॉक्टर मानसिक आजाराचे बळी

तणावामुळे निवासी डॉक्टर मानसिक आजाराचे बळी

Next

मुंबई : एमबीबीएस पूर्ण केल्यावर पदव्युत्तर शिक्षण घेताना डॉक्टरांना अभ्यासाच्या बरोबरीनेच बाह्यरुग्ण विभाग पाहणे, रुग्णांवर उपचार करणे हे सर्व अभ्यासाचा एक भाग म्हणून पाहावे लागते. पण रुग्णसेवा करणाऱ्या निवासी डॉक्टरांचे मानसिक आरोग्य त्यामुळे धोक्यात येत असल्याचे चित्र आहे. निवासी डॉक्टरांवरील अतिरिक्त ताणामुळे मनोविकाराचे प्रमाण वाढत आहे.
केईएम रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केला. यामागचे प्रमुख कारण त्याला मिळणारी कमी झोप आणि त्यामुळे त्याचा वाढणारा मानसिक ताण हे आहे. सलग १८ तासांची ड्युटी. योग्य सकस आहार नाही. झोपण्यासाठी अपुरा वेळ. कमी-अधिक प्रमाणात निवासी डॉक्टरांची हीच स्थिती आहे. सहा ते सात तास शांत झोप मिळाली नाही तर मानसिक ताण वाढतो, असे मध्यवर्ती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.

Web Title: Due to stress, the resident doctor is a victim of mental illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.