स्वामी समर्थ उद्यानाला धोका, रस्त्यांमुळे उद्यानावर हातोड्याची शक्यता, निसर्ग सौंदर्य नष्ट होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 03:45 AM2017-08-28T03:45:19+5:302017-08-28T03:45:42+5:30

मुलुंड पूर्वेकडील श्रीस्वामी समर्थ उद्यान २०१० साली कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, नगरसेविका ज्योती वैती आणि माजी महापौर

 Due to the threat to Swami Samartha park, the possibility of hood for the park due to roads, the danger of nature's beauty disappeared | स्वामी समर्थ उद्यानाला धोका, रस्त्यांमुळे उद्यानावर हातोड्याची शक्यता, निसर्ग सौंदर्य नष्ट होण्याची भीती

स्वामी समर्थ उद्यानाला धोका, रस्त्यांमुळे उद्यानावर हातोड्याची शक्यता, निसर्ग सौंदर्य नष्ट होण्याची भीती

Next

सागर नेवरेकर
मुंबई : मुलुंड पूर्वेकडील श्रीस्वामी समर्थ उद्यान २०१० साली कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, नगरसेविका ज्योती वैती आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. रहिवाशांसाठी जून २०१०मध्ये हे उद्यान खुले करण्यात आले. या उद्यानात ८ वर्षांपूर्वीची जुनी झाडे आहेत. या उद्यानाचे ‘लँड स्केपिंग’ही अतिशय उत्कृष्टपणे तयार केले आहे. सध्या सर्व वयोगटातील नागरिकांना या उद्यानाचा लाभ होत आहे.
तथापि, रस्त्यांच्या विस्तारीकरण आणि नव्या रस्त्यांसाठी या उद्यानावर टाच येण्याचा धोका निर्माण झालेला आहे. चार-पाच महिन्यांपासून पूर्वद्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी
होते. हायवेवरून मुलुंड ईस्टला येण्यासाठी असलेल्या एकमेव नवघर रोड येथे सायंकाळी वाहनांची कोंडी होत असते.
कोंडीवर मात करण्यासाठी हायवेवरून मुलुंड पश्चिमेला जाणारा मुलुंड गोरेगांव लिंक रोड आणि हायवेवरून मुलुंड स्टेशनला जाणारा नवघर रोड येथील ९० फूट रोडला जोडणारा रस्ता काढून, उद्यानांच्या आतून रस्ता काढण्यात येणार आहे. त्यामुळे हे सुंदर उद्यान नष्ट होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी, शासनाने उद्यान उभारण्यासाठी लाखो रुपये खर्च केले, परंतु निव्वळ पक्षीय राजकारण करून, उद्यानाला धोका पोहोचविला जात आहे, तसेच उद्यानातील झाडांवर खूण करण्यात आलेली आहे. उद्यानाबाहेरील काही झाडे तोडली गेली आहेत.
उद्यानासंबंधी स्थानिक नगरसेविका रजनी केणी यांच्याशी वारंवार फोनवरून संपर्क आणि मेसेज केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

पक्षीय राजकारणाचे गालबोट
या उद्यानाच्या प्रारंभी शिवसेनेने मोठी ताकद लावली होती. किंबहुना, शिवसेनेच्या प्रयत्नातून या उद्यानाची उभारणी झाली आहे. रश्मी ठाकरे या उद्यानाच्या उद्घाटनालाही आल्या होत्या.आता त्यात पक्षीय राजकारण आणून, स्थानिक भाजपा पदाधिकारी हे उद्यान हटविण्याचा मागे असल्याचे सूत्रांनी सांगितले. विकासाचा मुद्दा पुढे करून, उद्यानावर गदा आणण्याचा भाजपाचा डाव असल्याचेही रहिवाशांचे म्हणणे आहे.

उद्यानाला धोका नाही
रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे उद्यानाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. सध्या आहे, तसेच हे उद्यान राहणार आहे. आम्ही उद्यानाच्या अस्तित्वासाठी प्रयत्नशील आहोत. - प्रभाकर शिंदे, स्थानिक नगरसेवक

पर्याय असताना चुकीचा मार्ग का?
नुसती जाणीव असून, भविष्यातील सदर अडचणींवर मात करता येणार नाही. त्यासाठी कृतीचीही आवश्यकता आहे. कारण या उद्यानातील एकूण झाडांच्या संख्येपैकी सुमारे ९४ मोठ्या प्रमाणात वाढ झालेल्या झाडांची तोड करावी लागणार आहे. तेही उद्यान वाचवून रस्ता करण्याचे इतर पर्याय उपलब्ध असतानादेखील चुकीचा मार्ग अवलंबला जातो. जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय भयंकर ठरणारा मार्गाचा अवलंब करून, कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवणे योग्य नाही. - रवींद्र शिंदे, स्थानिक रहिवाशी

एका बाजूला पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय योजना राबवायच्या, जनतेला प्रबोधन करायचे आणि सर्व शासकीय विभागांना वृक्ष लागवड व वृक्षवाढीच्या कामाला जुंपायचे, तसेच उद्यानात सात वर्षांच्या कष्टामधून निर्माण झालेले सुंदर उद्यानाचे आणि असंख्य वृक्षांची कत्तल करून, रस्ते तयार केले जाणार आहेत.
- गिरीश महाडेश्वर, स्थानिक रहिवाशी

वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यास, त्याला वेळीच आळा घातला नाही, तर तापमान वाढणे व पर्यायाने पर्जन्यमान कमी होणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात. भविष्यात होणाºया गंभीर परिणामांची आताच काळजी घेऊन उपाययोजना न केल्यास, पृथ्वीतलावरील सर्व सजीव प्राण्यांवर पाण्याच्या कमतरतेमुळे गंभीर परिणाम होणार आहेत.
- दिलीप लोटलीकर, स्थानिक रहिवाशी
 

Web Title:  Due to the threat to Swami Samartha park, the possibility of hood for the park due to roads, the danger of nature's beauty disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.