मुंबईकरांसाठी आठवड्याचा पहिला दिवस लोकल कोंडीचा ठरला आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकात तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे चर्चगेटच्या दिशेनं धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक जवळपास २० ते २५ मिनिटं उशीराने सुरू आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांची कोंडी झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. बोरीवली, कांदिवली, मालाडसह वसई, नालासोपारा आणि विरार स्थानकांवर तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे.
बोरीवली ते कांदिवली स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बोरीवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर अतिरिक्त ताण आला आहे. बोरीवलीहून सुटणाऱ्या धीम्या लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक ३,४,५,६,७ आणि ८ वरुन सुटत आहेत. यामुळे जलद मार्गावरील लोकलवरही परिणाम झाला आहे.