थकबाकीमुळे एमएसआरडीसीने उड्डाणपुलावरील टॉवर्स उखडले; कारवाईमुळे गेले मोबाईल नेटवर्क 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 10:33 AM2022-02-06T10:33:18+5:302022-02-06T10:36:31+5:30

एका उड्डाणपुलावर किमान दोन टॉवर्स असून, या टॉवर्सवर जिओ, व्होडाफोन, एअरटेल आणि बीएसएनएलसारख्या कंपन्यांची उपकरणे आहेत.

Due to arrears, MSRDC removed the towers on the flyover; Mobile network gone due to action | थकबाकीमुळे एमएसआरडीसीने उड्डाणपुलावरील टॉवर्स उखडले; कारवाईमुळे गेले मोबाईल नेटवर्क 

थकबाकीमुळे एमएसआरडीसीने उड्डाणपुलावरील टॉवर्स उखडले; कारवाईमुळे गेले मोबाईल नेटवर्क 

Next

सचिन लुंगसे -

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने थकबाकीच्या कारणात्सव मुंबई शहर आणि उपनगरातील उड्डाणपुलावर बसविलेल्या मोबाईल टॉवर्सवर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोबाईल नेटवर्कच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. यात जिओ, व्होडाफोन, एअरटेल आणि बीएसएनएलच्या लाखो ग्राहकांचा समावेश असून, जोवर इंटरनेट प्रोव्हायर्डस व्हेंडर्स थकबाकीचे ३० कोटी भरत नाहीत, तोवर ग्राहकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासोबत उड्डाणपुलावर टॉवर्स बसविण्यासाठी मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी व्हेंडर्सच्या माध्यमातून करार केला आहे. महामंडळ आणि कंपन्यांच्या मधोमध सुयोग टेलिमेटिक्स व्हेंडर्स असून, व्हेडर्सने महामंडळासोबत करार केला आहे. या करारानुसार, मुंबई शहर आणि उपनगरातील उड्डाणपुलावर टॉवर्स बसविले आहेत. यासाठी व्हेंडर्सने आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत. शिवाय मोबाईल नेटवर्क टॉवर्सच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारीदेखील व्हेंडर्सची आहे. या सगळ्या मोबदल्यात मोबाईल नेटवर्क कंपन्या व्हेंडर्सला भाडे देत आहेत.

एका उड्डाणपुलावर किमान दोन टॉवर्स असून, या टॉवर्सवर जिओ, व्होडाफोन, एअरटेल आणि बीएसएनएलसारख्या कंपन्यांची उपकरणे आहेत. उड्डाणपुलावरून प्रवास करणाऱ्या ग्राहकांना याद्वारे रेंज मिळते. या टॉवर्सची रेंज दीड ते दोन किलोमीटरच्या परिघात आहे. एकूण उड्डाणपुलावरील टॉवर्सचा आकडा सरासरी ३५० ते ४०० च्या घरात आहे. 

जिओची सेवा ठप्प -
- देशातील आघाडीची खासगी दूरसंचार कंपनी असलेल्या जिओची सेवा शनिवारी ठप्प झाली. त्यामुळे मुंबई सर्कलमधील ग्राहकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला.
- शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात जिओचे नेटवर्क गायब झाले.
- काही भागात २ च्या दरम्यान नेटवर्क आले, तर काही भागात सेवा सुरळीत होण्यास सायंकाळचे ४ वाजले. वीकएन्डला ओटीटीवर चित्रपट वा मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहण्याचे नियोजन केलेल्यांचा मात्र यामुळे पुरता हिरमोड झाला. इंटरनेटसह फोन कॉलही करता येत नसल्याने त्यांना विरंगुळ्यासाठी दूरचित्रवाणीचा आधार घ्यावा लागला. जिओचे नेटवर्क गायब होण्यामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. जिओकडूनही याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

अशाही अडचणी...
करार संपल्याने पुलावरील टॉवर हटवण्याची कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे कॉल ड्रॉप, कॉल न लागणे, आवाज अस्पष्ट येणे, मोबाईल नेटवर्क नसणे, इंटरनेटचा वेग कमी होत आहे. मात्र, ही कारवाई ताबडतोब थांबून तोडगा काढावा, अशी मागणी सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे करण्यात आली आहे.

सहकार्याची अपेक्षा
डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायर्डस असोसिएशनचा सदस्य असलेल्या या प्रकरणातील इंटरनेट प्रोव्हायर्डस व्हेंडर्सचे नाव सुयोग टेलिमेटिक्स असे आहे. याबाबत असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक तिलक राज दुआ यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला असून, आम्हाला त्यांनी सहकार्य करावे.
 

Web Title: Due to arrears, MSRDC removed the towers on the flyover; Mobile network gone due to action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.