आमच्या प्रश्नाची उत्तरे द्या .. ! चारकोप विकास समितीकडून महापालिकेला पत्र
By सीमा महांगडे | Updated: March 21, 2025 00:04 IST2025-03-21T00:04:04+5:302025-03-21T00:04:33+5:30
सेक्टर ८ मधील स्थानिकांचा विरोध कायम, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा म्हणजे मुंबई उपनगरातील वर्सोवा ते भाईंदर पर्यंतचा कोस्टल रोड असून त्याचे काम पालिकेकडे आहे

आमच्या प्रश्नाची उत्तरे द्या .. ! चारकोप विकास समितीकडून महापालिकेला पत्र
मुंबई: कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा – दहिसर दरम्यानच्या विस्तारासाठी कांदिवलीमधील स्थानिकांनी लावलेल्या १९० हून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. याला स्थानिकांच्या विरोधानंतर तोडगा म्हणून पालिका अधिकारी स्थानिक आणि आमदार यांच्यासोबत लवकरच एक प्रत्यक्ष पाहणी दौरा करून याच निर्णय घेतला जाणार होता. मात्र अधिवेशन काळामुळे तो लाभला जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान या पुलामुळे बाधित होणाऱ्या परिसरातील चारकोप सेक्टर ८ विकास समितीकडून पलिक पूल विभागाला पत्र लिहून आपल्या तक्रारी आणि चिंता मांडल्या आहेत. शिवाय आपल्या टीमने चारकोप येथे प्रत्यक्ष भेट देऊन कोस्टल रोडचा पुढचा टप्पा कसा असेल, कसा विकसित होईल याचे प्रात्यक्षिक द्यावे अशी अंगणी केली आहे.
कोस्टल रोडचा दुसरा टप्पा म्हणजे मुंबई उपनगरातील वर्सोवा ते भाईंदर पर्यंतचा कोस्टल रोड असून त्याचे काम पालिकेकडे आहे. यासंबंधी पालिकेकडून भू संपादन करण्यासोबत , आवश्यक तेथे जागा मोकळी करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. याचंच भाग म्हणून कांदिवलीतील चारकोप सेक्टर ८ येथील ३०० हून अधिक झाडांवर ती हटवण्याची आणि पुनर्रोपणाची कारवी केली जाणार आहे. मात्र याला तेथील स्थानिकांचा प्रचंड विरोध होत आहे. चारकोप विकास समितीकडून पालिकेच्या मुख्य अभियंत्यांना आपल्या तक्रारी दाखल केल्या असून त्यांचे निराकरण कण्याची मागणी केली आहे. चारकोप परिसरात मोठ्या क्षेत्रात खारफुटी पसरली असून यामुळे पावसाळ्यात येणारी पूर परिस्थिती रोखली जाते. मग अशा परिस्थितीत ही खारफुटी हटवल्यानंतर पालिका काय प्रतिबंधात्मक उपाय करणार आहार का असं अप्र्श्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
पार्किंग करायची कुठे ?
पालिकेच्या माहितीनुसार सध्याच्या इमारतीपासून ३० फूट अंतरावर असलेल्या झाडे कापण्यात येतील आणि खारफुटी संरक्षणासाठी असलेल्या भिंतीचे पाडकाम कऱण्यात येईल. मात्र पुनरोपण दरम्यान ही झाडे जगतील का ? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. शिवाय सध्यस्थितीत पार्क केली जाणारी वाहने, शाळेच्या बसगाड्या यांची वाहतूक अरुंद जागेत कशी होणार असे ही प्रश्न उपस्थित केले आहेत.
अन्यथा लढा कायम
पालिका आणि आमदारांसोबत झालेल्या बैठकीत याचा तोडगा निघाला नाही. महल ही समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत. पालिकेच्या प्रकल्पाचा आरखडा काय आहे? आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे काय ? याची माहिती आम्हाला मिळणे हा आमचा अधिकार आहे. त्यामुळे आता आम्ही यासाठी लढा देणार आहोत - मिली शेट्टी, पर्यावरण तज्ज्ञ