लोणावळा-कर्जतमधील क्रॉसिंग पॉइंट फेल! पुणे-मुंबई वाहतूक खोळंबली, चाकरमान्यांना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 09:08 AM2023-06-28T09:08:57+5:302023-06-28T09:12:50+5:30

पळसदरी स्थानकाजवळ असलेला एका क्रॉसिंग पॉइंटमध्ये बिघाड झाला.

due to crossing point fails pune mumbai railway services affected trains running late | लोणावळा-कर्जतमधील क्रॉसिंग पॉइंट फेल! पुणे-मुंबई वाहतूक खोळंबली, चाकरमान्यांना मनस्ताप

लोणावळा-कर्जतमधील क्रॉसिंग पॉइंट फेल! पुणे-मुंबई वाहतूक खोळंबली, चाकरमान्यांना मनस्ताप

googlenewsNext

मुंबई: लोणावळा ते कर्जतमधील क्रॉसिंग पॉइंट फेल झाल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे सिंहगड एक्स्प्रेसह अनेक ट्रेनना याचा फटका बसला आहे. पळसदरी स्थानकाच्या अलीकडील पॉइंट फेल झाला आहे. यामुळे गेल्या तासभराहून अधिक काळ वाहतूक खोळंबलेली.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा ते कर्जतमध्ये असलेल्या पळसदरी स्थानकाजवळ असलेला एका क्रॉसिंग पॉइंटमध्ये बिघाड झाला. यामुळे पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली आहे. सिंहगड एक्सप्रेस कर्जत स्थानकाच्या अलीकडे सुमारे दीड तास थांबली होती. त्यामुळे त्यामागून येणाऱ्या सर्व रेल्वेसेवांवर याचा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. सकाळच क्रॉसिंग पॉइंट फेल झाल्याने पुण्याहून मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे म्हटले जात आहे. 

दरम्यान, पुण्यातून सकाळच्या वेळेत अनेक ट्रेन चाकरमान्यांना घेऊन मुंबईत येत असतात. हजारो प्रवासी दररोज पुणे-मुंबईचा प्रवास करत असतात. मात्र, ट्रेनच्या झालेल्या खोळंब्यामुळे चाकरमान्यांना सकाळच मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. 


 

Web Title: due to crossing point fails pune mumbai railway services affected trains running late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.