धुक्यामुळे इंडिगोचे विमान पोहोचले थेट बांगलादेशात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 07:35 AM2024-01-14T07:35:53+5:302024-01-14T07:36:08+5:30

इंडिगो कंपनीच्या ६ ई ५३१९ या विमानाने मुंबईहून गुवाहाटीसाठी उड्डाण केले. मात्र, दाट धुक्यामुळे कमी दृश्यमानता होती.

Due to fog, the IndiGo flight reached directly to Bangladesh | धुक्यामुळे इंडिगोचे विमान पोहोचले थेट बांगलादेशात

धुक्यामुळे इंडिगोचे विमान पोहोचले थेट बांगलादेशात

मुंबई : मुंबईतून गुवाहाटीला जाण्यासाठी इंडिगोचे विमान उडाले. मात्र दाट धुक्यामुळे गुवाहाटीत लँडिंग शक्य नसल्याने हे विमान बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका येथे उतरविण्यात आले. परदेशात विमान लँड झाल्यामुळे प्रवाशांना विमानातून खाली उतरता आले नाही. प्रवाशांना नऊ तास विमानातच बसावे लागले.

इंडिगो कंपनीच्या ६ ई ५३१९ या विमानाने मुंबईहून गुवाहाटीसाठी उड्डाण केले. मात्र, दाट धुक्यामुळे कमी दृश्यमानता होती. त्यामुळे विमान गुवाहाटी विमानतळावर उतरवणे वैमानिकाला अशक्य झाले. त्याने जवळच्या ढाका विमानतळाशी संपर्क साधून लँडिंगची परवानगी मागितली. परवानगी मिळताच त्याने विमान तिथे उतरवले. प्रवाशांकडे पासपोर्ट नसल्याने कुणालाही विमानातून खाली उतरता आले नाही. नऊ तासांनी  इंडिगोने पर्यायी कर्मचाऱ्यांची व्यवस्था केल्याने शुक्रवारी विमान गुवाहाटीकडे झेपावले. 

Web Title: Due to fog, the IndiGo flight reached directly to Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indigoइंडिगो