कोकणात जायचंय? क्षमस्व; गणेशोत्सवामुळे गाड्यांचे आरक्षण फुल्ल, चाकरमानी खोळंबले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 06:32 AM2022-08-08T06:32:22+5:302022-08-08T06:32:39+5:30

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे गृहीत धरून मध्य आणि पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत.

Due to Ganeshotsav, reservation of trains is full and busy for konkan | कोकणात जायचंय? क्षमस्व; गणेशोत्सवामुळे गाड्यांचे आरक्षण फुल्ल, चाकरमानी खोळंबले

कोकणात जायचंय? क्षमस्व; गणेशोत्सवामुळे गाड्यांचे आरक्षण फुल्ल, चाकरमानी खोळंबले

googlenewsNext

मुंबई : गणेशोत्सव ३१ ऑगस्टपासून सुरू होत आहे. चाकरमान्यांची कोकणात जाण्यासाठी लगबग सुरू झाली असली तरी या काळातील काही मेल एक्सप्रेस गाड्यांचे प्रतीक्षायादीचे तिकीट देणेही बंद केले आहे. तिकीट काढताना ‘क्षमस्व’ असाच संदेश येत आहे. यंदा

गणेशोत्सवानिमित्तकोकणात जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे गृहीत धरून मध्य आणि पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत. मात्र, कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांबरोबरच विशेष रेल्वे गाड्यांनाही प्रतीक्षायादी आहे. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या काही श्रेणींचे तिकीट काढताना सध्या क्षमस्व (रिग्रेट) असा संदेश मुंबईकरांना येत आहे. गणेशोत्सवानिमित्त २७ ते ३१ ऑगस्ट या काळात कोकणात मोठ्या संख्येने नागरिक जात आहेत.

एलटीटी ते ठाकूर एक्स्प्रेस (सावंतवाडी, सिंधुदुर्गपर्यंत), कोकणकन्या एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल-मडगांव विशेष यासह अन्य काही गाड्यांच्या स्लीपर श्रेणीच्या प्रतीक्षायादीचे तिकीटही देणे बंद करण्यात आले आहे. तर ७ सप्टेंबरला ३०० हून अधिक प्रतीक्षायादी आहे. कोकणकन्या एक्स्प्रेसमधील स्लीपर श्रेणीलाही सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग येथून मुंबईत येण्यासाठी या दोन दिवसांत प्रतीक्षायादीचेही तिकीट उपलब्ध नाही.

मांडवी एक्स्प्रेसलाही ६ सप्टेंबरला स्लीपर श्रेणीला ‘क्षमस्व’ आणि ७ तारखेला ४०० प्रतीक्षायादी आहे. तर तुतारी एक्स्प्रेस, मडगांव-मुंबई सेन्ट्रल विशेष गाडी, कुडाळ-वसई विशेष गाडी, सीएसएमटीला येणारी जनशताब्दी एक्स्प्रेस, सावंतवाडी-दिवा (पनवेलपर्यंत), एलटीटीटीला येणारी डबल डेकर, सावंतवाडी-सीएसएमटी विशेष गाड्यांच्या ६ आणि ७ सप्टेंबरच्या परतीच्या स्लीपर श्रेणीसह विविध श्रेणीचे तिकीट हाऊसफुल्ल झाले आहे.

एसटी, खासगी बसचा आधार 

आता याच काळातील परतीच्या प्रवासाच्या आरक्षणाचीही अशीच अवस्था आहे. यंदा गौरी-गणपतींचे सहाव्या दिवशी विसर्जन होणार असून परतीच्या प्रवासाचे तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र परतीच्या प्रवासासाठी ६ आणि ७ सप्टेंबर रोजी स्लीपर श्रेणीच्या प्रतीक्षायादीचे तिकीटही उपलब्ध नाही. अन्य श्रेणींनाही मोठी प्रतीक्षायादी आहे. बहुतांश मंडळींना एसटी, खासगी प्रवासी बस किंवा वैयक्तिक वाहनांमधूनच प्रवास करावा लागणार आहे.

एसटीही फुल्ल 

मुंबई विभागातून कोकणात जाणाऱ्या एसटीही फुल्ल आहेत. आतापर्यंत ९०० गाड्यांचे बुकिंग करण्यात आले असून १५० गाड्यांचे बुकिंग सुरु असून ११०० गाड्यांचे बुकिंग होईल अशी अपेक्षा आहे. विशेषतः ग्रुप बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Due to Ganeshotsav, reservation of trains is full and busy for konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.