मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि ‘एपीएल’मधील असे सर्व मिळून २३ लाख ५५ हजार ४४२ लाभार्थी मुंबई क्षेत्रात आहेत; मात्र यापैकी ३० टक्के लाभार्थ्यांचे मोबाइल आणि आधार लिंक अजून लिंक झालेले नाही. त्यामुळे शासनाकडून अशा कार्डधारकांचे धान्य बंद करण्यात येत आहे.
२३ लाख जणांना मोफत रेशन -
मुंबई शहरात शासनाच्या स्वस्त मोफत धान्य वितरण प्रणालींतर्गत जवळपास २३ लाख ५५ हजार ४४२ रेशन कार्डधारक आहेत.
३८० जणांचे धान्य बंद -
मोबाइल आधार लिंकिंग पूर्ण केलेले नसल्यामुळे रेशन दुकानांत रेशन देणे थांबविण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांत अशा ३८० जणांचे रेशन थांबले होते. त्यापैकी ज्यांनी लिंकिंग पूर्ण केले त्याचे पुन्हा रेशन सुरू झाले आहे.
शहरात शासनाच्या स्वस्त, मोफत धान्य वितरण प्रणालींतर्गत जवळपास २३ लाख ५५ हजार ४४२ रेशन कार्डधारक आहेत. त्यापैकी जवळपास ३० टक्के मोबाइल आधार लिंकिंग अद्याप पूर्ण झालेले नाही.
कोणाला मिळते मोफत रेशन?
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना, राज्य योजनेच्या सर्व शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशनची सुविधा आहे.