नेटवर्क नसल्याने रेल्वे प्रवासी, कर्मचाऱ्यांची वायफायकडे पाठ; मोबाइल डेटाचा केला जातो वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 01:28 PM2023-08-04T13:28:49+5:302023-08-04T13:29:21+5:30

राज्यात ३८०हून अधिक रेल्वेस्थानकात वायफाय सेवा उपलब्ध आहे.

Due to lack of network, railway passengers, employees turn to WiFi; Mobile data is used | नेटवर्क नसल्याने रेल्वे प्रवासी, कर्मचाऱ्यांची वायफायकडे पाठ; मोबाइल डेटाचा केला जातो वापर

नेटवर्क नसल्याने रेल्वे प्रवासी, कर्मचाऱ्यांची वायफायकडे पाठ; मोबाइल डेटाचा केला जातो वापर

googlenewsNext

मुंबई : सध्याच्या काळात वायफायचा वापर चांगलाच वाढला आहे. मुंबईतील अनेक रेल्वेस्थानकातवायफाय सेवा सुरू करण्यात आली आहे, असे असले तरी वायफायचे नेट स्लो असल्याने प्रवासी आणि कर्मचारी त्याकडे पाठ फिरवत आहेत. राज्यात ३८०हून अधिक रेल्वेस्थानकात वायफाय सेवा उपलब्ध आहे.

मुंबईत सीएसटी स्थानकात लोकलमध्ये  मुंबई आणि महानगर परिसरातील तसेच एक्स्प्रेस गाड्यांसाठी राज्यांतर्गत आणि  परराज्यातील काही प्रवासी येतात. रेल्वेस्थानकावर वायफाय सुविधेचे फलक आहेत? मुंबईत रेल्वेस्थानकात वायफाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. याची माहिती प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना आहे. रेल्वे वायफायचे नेट स्लो असल्याने कर्मचारी, प्रवासी त्याचा वापर कमी प्रमाणात करत आहेत.

रेल्वेस्थानकात रेल्वेची वायफाय सेवा आहे, याबाबत माहिती आहे. पण हे नेट स्लो असल्याने मोबाइलचे नेट वापरतो. 
- अभिजित गवई, प्रवासी

रेल्वेस्थानकात वायफाय सुरू आहे; पण मोफत वायफाय धीम्या गतीने सुरू असते. पैसे देऊन वायफाय चांगले आहे. पण त्या वायफायला खर्च करण्यापेक्षा मोबाइल रिचार्ज परवडतो.
- विवेक काटे, प्रवासी

होय वायफाय सेवा सुरू आहे. सुरुवातीला या वायफाय सेवेचा वापर केला. पण तांत्रिक अडचणी येतात त्यामुळे मोबाइल नेट वापरतो. 
- रेल्वे कर्मचारी

रेल्वे परिसरात काम करताना जास्त वेळ मोबाइल पाहत नाही. त्यामुळे मोबाइलचा डेटा शिल्लक राहतो. त्यामुळे रेल्वेचे वायफाय वापरत नाही.
- रेल्वे कर्मचारी
 

Web Title: Due to lack of network, railway passengers, employees turn to WiFi; Mobile data is used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.