मुंबई : सध्याच्या काळात वायफायचा वापर चांगलाच वाढला आहे. मुंबईतील अनेक रेल्वेस्थानकातवायफाय सेवा सुरू करण्यात आली आहे, असे असले तरी वायफायचे नेट स्लो असल्याने प्रवासी आणि कर्मचारी त्याकडे पाठ फिरवत आहेत. राज्यात ३८०हून अधिक रेल्वेस्थानकात वायफाय सेवा उपलब्ध आहे.मुंबईत सीएसटी स्थानकात लोकलमध्ये मुंबई आणि महानगर परिसरातील तसेच एक्स्प्रेस गाड्यांसाठी राज्यांतर्गत आणि परराज्यातील काही प्रवासी येतात. रेल्वेस्थानकावर वायफाय सुविधेचे फलक आहेत? मुंबईत रेल्वेस्थानकात वायफाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. याची माहिती प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना आहे. रेल्वे वायफायचे नेट स्लो असल्याने कर्मचारी, प्रवासी त्याचा वापर कमी प्रमाणात करत आहेत.
रेल्वेस्थानकात रेल्वेची वायफाय सेवा आहे, याबाबत माहिती आहे. पण हे नेट स्लो असल्याने मोबाइलचे नेट वापरतो. - अभिजित गवई, प्रवासी
रेल्वेस्थानकात वायफाय सुरू आहे; पण मोफत वायफाय धीम्या गतीने सुरू असते. पैसे देऊन वायफाय चांगले आहे. पण त्या वायफायला खर्च करण्यापेक्षा मोबाइल रिचार्ज परवडतो.- विवेक काटे, प्रवासी
होय वायफाय सेवा सुरू आहे. सुरुवातीला या वायफाय सेवेचा वापर केला. पण तांत्रिक अडचणी येतात त्यामुळे मोबाइल नेट वापरतो. - रेल्वे कर्मचारी
रेल्वे परिसरात काम करताना जास्त वेळ मोबाइल पाहत नाही. त्यामुळे मोबाइलचा डेटा शिल्लक राहतो. त्यामुळे रेल्वेचे वायफाय वापरत नाही.- रेल्वे कर्मचारी