अधिकमासामुळे शुभमंगलही लांबले, पुढच्या वर्षीही बरेच मुहूर्त; लग्न रखडली 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 01:04 PM2023-11-06T13:04:56+5:302023-11-06T13:05:05+5:30

पुढील वर्षभरातदेखील लग्नाचे बरेच मुहूर्त आहेत.

Due to the adhikamas, Shubhmangal was also delayed, many muhurtas in the next year too; Marriage stopped | अधिकमासामुळे शुभमंगलही लांबले, पुढच्या वर्षीही बरेच मुहूर्त; लग्न रखडली 

अधिकमासामुळे शुभमंगलही लांबले, पुढच्या वर्षीही बरेच मुहूर्त; लग्न रखडली 

मुंबई : वर्ष २०२३ संपायला अवघे दोन महिने शिल्लक असून, यंदा अधिकमासामुळे अनेक जोडप्यांची लग्न लांबणीवर पडली होती. तर मार्च, एप्रिल महिन्यांत विवाह मुहूर्त एकही नसल्याने अनेक इच्छुक जोडप्यांची लग्न रखडली होती. मे महिन्यात काही जोडप्यांची दणक्यात लग्न झाली हिंदू समाजात पितृपक्षात विवाह केले जात नाहीत, त्यामुळेदेखील लग्न झाली नाहीत; आता मात्र विवाहासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांना या दोन महिन्यांत जोरदार लग्नाचा बार उडवता येणार आहे. तर पुढील वर्षभरातदेखील लग्नाचे बरेच मुहूर्त आहेत.

लग्न पुढे ढकलले... 
मुहूर्त पाहूनच अनेक इच्छुक वधू-वर बोहोल्यासाठी उभे राहतात. २०२३ मध्ये जानेवारी, फेब्रुवारी नंतर लग्नासाठी थेट मे महिन्यात मुहूर्त होते. मात्र, मे महिन्यातील उकाडा आणि आधीच फुल्ल झालेले हॉल पाहता अनेक जोडप्यांनी आपले लग्न पुढे ढकलले. जूनमध्ये मुहूर्त असले तरी लग्नासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांनी पावसाळ्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यातच अधिकमास आला इतकेच काय तर पितृपक्षामुळेदेखील अनेक विवाह रखडली.

हॉटेल्स हॉलची बुकिंग
लग्नासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांना जूननंतर थेट नोव्हेंबर महिन्यात विवाह करता येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात लग्न करण्यासाठी नातेवाइकांची लगबग सुरू झाली आहे. सभागृह,  लॉन, हॉटेल्स तसेच मंगल कार्यालये बुक केली जात आहेत.

 बँडबाजाची बुकिंग 
  लग्न सोहळा जीवनात एकदाच होत असल्याने हा विवाह दणक्यात साजरा करण्यासाठी बँडबाजा, डीजेची ऑर्डर दिली जाते. 
  त्यासाठी आतापासून बुकिंग केले जात असून, लग्नात येणाऱ्या यजमानांना चविष्ट जेवण खाऊ घालण्यासाठी मेनू काय ठरवायचा याचे बेत आखले जात आहेत.

२०२३ - २४  मध्ये हे आहेत लग्नाचे मुहूर्त
  नोव्हेंबर : २३, २४, २७, २८, २९
  डिसेंबर : ५, ६, ७, ८, ९, ११, १५
  जानेवारी : २, ३, ४, ५, ६, ८, १७, २२, २७
  फेब्रुवारी : १, २, ४,६, १२, १३, १७, १८, २४, २६, २७, २८, २९
  मार्च : ३, ४, ६, १६, १७, २६, २७, ३०
  एप्रिल : १, ३, ५, १८, २०, २१, २२, २६, २८
  मे : १, २
  जून : २९, ३०
  जुलै : ९, ११, १२, १३, १४, १५, १९, २१, २२, २३, २५, २६, २७, २८, ३०, ३१
  ऑगस्ट : १०, १३, १४, १६, १८, १९, २३, २७, २८
  सप्टेंबर : ५, ६, १४, १५, १६
  ऑक्टोबर : ७, ९, ११, १२, १३, १६, १७, १८, २१, २६
  नोव्हेंबर : १७, २२, २३, २५, २६, २७
  डिसेंबर : ३, ४, ५, ६, ७, ११, १२, १४, १५, २०, २३, २४, २६

Web Title: Due to the adhikamas, Shubhmangal was also delayed, many muhurtas in the next year too; Marriage stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न