मुंबई : उपनगरीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीकरिता मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेतल्याने घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे रविवारी प्रचंड हाल झाले आहेत. माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर आणि कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असल्याने सायंकाळी ६:३० पर्यंत धिम्या मार्गावरील लोकल १५ ते २०, तर जलद मार्गावरील २० ते २५ मिनिटे धावत होत्या.
लोकल फेऱ्या १५ ते २५ मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले, तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला होता. त्यामुळे वाशी बेलापूर, पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वाशी/ पनवेल/ बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावर सेवा रद्द केल्या होत्या.