Join us  

गोरेगाव आयटी पार्क जवळ संरक्षक भिंत कोसळल्याने नाल्याजवळील रस्ता खचला

By मनोहर कुंभेजकर | Published: July 25, 2023 12:09 AM

यामध्ये अडकलेला टेम्पो बाहेर काढण्यात यश

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गोरेगाव पूर्वेकडील नागरी निवारा परिषद वसाहतीमधील आयटी पार्कजवळील नाल्याची संरक्षक भिंत पडली.नागरी निवारा परिषदेतील आयटी पार्क जवळील परिसर हा सकाळ-संध्याकाळी वर्दळीचा असतो. आज रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. नाल्याची भिंत कोसळल्याने नाल्या शेजारील रस्ता देखील खचला आहे. यामुळे एक अवजड टेम्पो देखील या ठिकाणी अडकला होता. टेम्पो काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली.क्रेनच्या मदतीने खचलेल्या रस्त्यात अडकलेल्या टेम्पोला बाहेर काढण्यात आले. टेम्पोला बाहेर काढल्यानंतर आयटी पार्क जवळील एक मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबई