अवकाळी पावसामुळे मच्छिमारांचे झाले नुकसान

By मनोहर कुंभेजकर | Published: May 15, 2024 04:52 PM2024-05-15T16:52:12+5:302024-05-15T16:52:45+5:30

परिस्थितीत नुकसान भरपाई मिळते, मात्र वादळी पावसाने मच्छिमारांचे नुकसान होते, परंतू शासन जातीने लक्ष देत नसल्याचा आरोप मच्छिमारांनी केला.

Due to unseasonal rain, fishermen suffered losses | अवकाळी पावसामुळे मच्छिमारांचे झाले नुकसान

अवकाळी पावसामुळे मच्छिमारांचे झाले नुकसान

मुंबई- आजच्या घडीला डिझेल व जाळीचे भाव गगनाला भिडले असून किमान तो ही खर्च निघत नसल्याने मासेमारी बांधव चिंतेतं आहेत.तर गेल्या सोमवारी अवकाळी वादळी पावसामुळे मुंबईतील कोळीवाड्यातील मासेमारी बांधवांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले झाले आहे.

अचानक झालेल्या वादळी पावसामुळे सर्व कोळीवाड्यात सुकी मासळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती खार दांडा कोळीवाडा येथील समाजसेवक मनोज कोळी यांनी लोकमतला दिली. शासनाने सदर प्रकरणी पंचनामे करून मच्छिमार बांधवाना नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

परिस्थितीत नुकसान भरपाई मिळते, मात्र वादळी पावसाने मच्छिमारांचे नुकसान होते, परंतू शासन जातीने लक्ष देत नसल्याचा आरोप मच्छिमारांनी केला.

मुंबईतील किनारपट्टीवर  असलेल्या प्रत्येक कोळीवाड्यात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात सुकी  मासळी सुकविली जाते कारण पावसाळ्यात शासना मार्फत 3-4 महिने मासेमारी वर बंदी असते.त्यामुळे मासेमारी बांधव सुकी मासळी म्हणजेच सुके बोंबील, जवळा, सुके मासे विकून आपला उदरनिर्वाह करत असतात. तसेच पावसाळ्यात सुक्या मासळीला मोठी मागणी असते अशी माहिती त्यांनी दिली.
 

Web Title: Due to unseasonal rain, fishermen suffered losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.