मुसळधार पावसाने रस्ते गेले वाहून , पावसापुढे पालिका प्रशासन हतबल

By admin | Published: September 21, 2016 08:31 PM2016-09-21T20:31:04+5:302016-09-21T20:31:04+5:30

मुसळधार हजेरी लवणाऱ्या पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा खड्ड्यात गेली आहे. यामुळे मतदारांमध्ये रोष वाढत असल्याने आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलेले नगरसेवक धास्तावले आहेत.

Due to torrential rains, the municipal administration in front of the monsoon has been running | मुसळधार पावसाने रस्ते गेले वाहून , पावसापुढे पालिका प्रशासन हतबल

मुसळधार पावसाने रस्ते गेले वाहून , पावसापुढे पालिका प्रशासन हतबल

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई , दि. २१ : अनंत चतुर्दशीपासून मुसळधार हजेरी लवणाऱ्या पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा खड्ड्यात गेली आहे. यामुळे मतदारांमध्ये रोष वाढत असल्याने आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलेले नगरसेवक धास्तावले आहेत. किमान निवडणुकीपूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याचे साकडे त्यांनी प्रशासनाला घातले आहे. मात्र पावसाला दोष देत प्रशासनानेही हातवर केल्याने नगरसेवक हवालदिल झाले आहेत.

मुंबई खड्डेमुक्त करण्याचे वचन पालिका पूर्ण करू न शकल्याने गणरायाचे आगमन खड्ड्यातून झाले. विसर्जनापूर्वी मुंबईत सर्व खड्डे भरले जातील, हा शब्दही प्रशासनाने पाळला नाही. त्यातच अनंत चतुर्दशीपासून मुंबईत सतत मुसळधार पास कोसळत असल्याने मुंबई खड्ड्यात गेली आहे. बुजवलेल्या खड्ड्यांमधील मालही पाण्यात वाहून गेला आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी वाढली असून अपघाताचा धोकादेखील वाढला आहे. याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत आज उमटले.
नागरिकांची गैरसोय होत आहे, मुंबईकरांमध्ये नाराजी वाढत आहे. परंतू तक्रार करुनही पालिका दखल घेत नाही, जनतेला मुर्ख बनविण्याचे काम पालिका करीत आहे, अशी नाराजी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली. गेल्यावर्षी ज्या ठिकाणी खड्डे भरले होते, तिथेच पुन्हा खड्डे पडले आहेत. तरीही पालिकेला यावर अद्याप रामबाण उपाय सापडलेला नाही, असा संताप समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी व्यक्त केला. प्रतिनिधी


प्रशासन हतबल, विरोधकांचा सभात्याग
नगरसेवकांनी खड्ड्यांच्या तक्रारी करीत लवकरात लवकर खड्डे भरण्याची मागणी लावून धरली. मात्र खड्डे भरण्याचे काम सुरु आहे, पण पावसापुढे नाईलाज होतोय, अशी सबब देत प्रशासनाने आपला बचाव केला. खड्डे भरण्याचा कामत पाऊस व्यत्यय आणत आहे, असा बचाव अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी केला. प्रशासनच्या या उत्तरामुळे नाराज पक्षांनी सभात्याग केला.

सर्वाधिक खड्ड्यात गेलेले वार्ड

बोरीवली ६०८, मलाड ४७५, अंधेरी पश्चिम ४२६, गोवंडी ३०५, दादर २३४, कुलाबा २२५


शहर १२५१
पश्चिम २१६७
पूर्व १०३७


२०१५ मध्ये ५२६६
२०१६ मध्ये ४४५५ 

Web Title: Due to torrential rains, the municipal administration in front of the monsoon has been running

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.