Join us

ट्रायच्या हलगर्जीमुळे दहा लाख ई-मेल हॅकर्ससाठी खुले

By admin | Published: April 28, 2015 1:57 AM

दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) या संदर्भातील प्राप्त माहिती ग्राहकाच्या ‘ई-मेल’ पत्त्यासह प्रसिद्ध केल्याने तब्बल १० लाख ग्राहकांचे ई-मेल पत्ते आता खुले झाले आहेत.

हाती लागला मोठा डेटा : नेट न्यूट्रॅलिटीच्या सूचना-हरकतीच्या निमित्ताने घोळमनोज गडनीस - मुंबईनेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्द्यावर सूचना व हरकती मागविणाऱ्या दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) या संदर्भातील प्राप्त माहिती ग्राहकाच्या ‘ई-मेल’ पत्त्यासह प्रसिद्ध केल्याने तब्बल १० लाख ग्राहकांचे ई-मेल पत्ते आता खुले झाले आहेत. यामुळे मोठी ‘डेटा चोरी’ची शक्यताही निर्माण झाली आहे. नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्द्यावर गेल्या २७ मार्च ते २४ एप्रिलदरम्यान ग्राहकांनी आपल्या सूचना व हरकती देण्याचे आवाहन ग्राहकांना केले होते. या सूचनांचे सार काढून अथवा मतांची टक्केवारी काढून अहवाल प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. (पान १० वर) (पान १ वरून) मात्र, त्यापेक्षा प्राप्त झालेली प्रत्येक सूचना पाठविणाऱ्याच्या ई-मेलसह आणि तारीख-वेळ या तपशिलासह ट्रायने प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ट्रायच्या वेबसाईटवरून जाऊन साधा सर्च देऊनही ही सर्व माहिती संध्याकाळी उशिरापर्यंत मिळवता येत होती. नंतर मात्र या माहितीच्या लिंकस् बंद करण्यात आल्या. या घोळाबाबत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ विजय मुखी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ही कृती अत्यंत अपरिपक्वतेची असून, ग्राहकाची अशी वैयक्तिक माहिती उघड करण्याचा ट्रायला अधिकार नाही. यामुळे एखाद्या हॅकर अथवा जाहिरातदाराला एकगठ्ठा माहिती मिळाली असणार. त्यामुळे अशा लोकांना यापुढे अनावश्यक जाहिरातींचा सामना करावा लागला तरी आश्चर्य वाटू नये. तसेच, एखाद्याने कंपनीच्या ई-मेलवरून जर सूचना केलेली असेल तर अशा कंपन्यांच्या सर्व्हरपर्यंत पोहोचणे हॅकरला सुलभ होणार असल्याचे मत मुखी यांनी व्यक्त केले. अ‍ॅनॉनिमसने केली चोरीट्रायकडून ही माहिती उघड झाल्यानंतर ‘अ‍ॅनॉनिमस इंडिया’ या हॅकर ग्रुपने थोड्याच वेळात आपण ट्रायचा डेटाबेस हॅक करणार असल्याचे टिष्ट्वटरवरून जाहीर केले आणि संध्याकाळी आपली धमकी प्रत्यक्षात आणली. आपल्याकडे कॉम्प्युटर आणि सायबर तंत्रज्ञानाचा वापर व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत गांभीर्याने होत आहे. अशा परिस्थितीत जर ग्राहकांची माहितीच विनासायास मिळणार असेल सुरक्षेची हमी कशी मिळेल? अमेरिकेप्रमाणे आपल्याकडेदेखील ‘प्रायव्हसी अँड डेटा प्रोटेक्शन’ कायदा होणे, हे आता नितांत गरजेचे आहे. - अमित कारखानीस, वकीललोकांपर्यंत पोहोचणे सोपेच्दहा लाख ई-मेल पत्ते खुले होणे ही साधुसाधी बाब नाही. जाहिरातदारांना हा डेटा खुला झाला.च्केवळ ई-मेल पत्ते नव्हे, तर ज्यांना संगणक अथवा तंत्रज्ञानाचे ज्ञान आहे अशा ‘जाणत्या’ लोकांचे हे पत्ते आहेत. त्यामुळे अशा लोकांपर्यंत एकगठ्ठा पोहोचणे सहज शक्य होणार आहे.दहा लाखांची माहिती अशा पद्धतीने उघड करणे ही अत्यंत बालीश कृती आहे. - विजय मुखी, सायबर सुरक्षा तज्ज्ञ