मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मैं भी चौकीदार’ या संकल्पनेला माझा पाठिंबा आहे. मीदेखील सोशल मीडियावरील खात्यावर माझ्या नावासमोर ‘चौकीदार’ शब्द जोडला होता. मात्र यानंतर जाणीवपूर्वक ट्रोल करण्यात आल्याने माझ्यामुळे या संकल्पनेवर टीका होऊ नये व त्याला फटका बसू नये म्हणून आपल्या नावासमोरून चौकीदार नाव हटवल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. सोमवारी संंकेतस्थळाशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.मुख्यमंत्र्यांनी आपल्या खात्याच्या कारभारात कधीही हस्तक्षेप केला नाही. माझी कधीही घुसमट झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे विद्यमान नेतृत्व अपयशी ठरल्याने प्रियांका गांधींना आणण्यात आले. प्रियांकामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळेल, असे मुंडे म्हणाल्या. विरोधी पक्षनेत्याची घोषणा झाल्यावर पुढील वाटचाल कशी असेल याचा अंदाज आला. आमच्या सरकारच्या काळात चांगल्या - वाईट बाबींचे अमृतमंथन झाले; त्यामध्ये विष माझ्या वाट्याला आले. मात्र येत्या निवडणुकीत काही पक्ष रडारवरून नष्ट होतील व माझा विषप्राशनाचा काळ संपेल, असे त्या म्हणाल्या.पंतप्रधान आंबेडकरवादी - रामदास आठवलेवंचित बहुजन आघाडीच्या सभांना गर्दी होत असली तरी त्याचे रूपांतर मतांमध्ये होणार की नाही हे सांगता येणार नाही. या आघाडीचा लाभ शिवसेना व भाजपा युतीला होईल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. पंतप्रधान हे आंबेडकरवादी आहेत. आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत थोडेसे मतभेद आहेत; मात्र भाजपाचे विचार आंबेडकरवादी झाले आहेत. रिपब्लिकन ऐक्यासाठी आपण तयार असून प्रकाश आंबेडकर आले तर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहे. मायावती आल्या तर त्यांना पक्षाचे अध्यक्षपद देण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.एमआयएमने पाठिंबा दिल्याचा दावावंचित बहुजन आघाडीची स्पर्धा भाजपा व शिवसेना या युतीशी असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्पर्धेत नसल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. अकोला किंवा सोलापूर यांपैकी कुठून लढायचे किंबहुना निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. एमआयएमला आम्ही सोबत घेतले नाही, तर एमआयएमने आम्हाला पाठिंबा दिला व आम्ही तो स्वीकारला, असे आंबेडकर म्हणाले..
ट्रोल झाल्याने नावासमोरील चौकीदार शब्द हटवला - मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 6:50 AM