Join us

ओखी चक्रीवादळामुळे मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 7:03 PM

मुंबई- अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘ओखी’ चक्रीवादळ सहा किलोमीटर प्रतितास या वेगाने उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकत आहे.

मुंबई- अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘ओखी’ चक्रीवादळ सहा किलोमीटर प्रतितास या वेगाने उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकत आहे. मात्र तसे असले तरी ते मुंबईपासून एक हजार किलोमीटर अंतरावर असून, समुद्र खवळलेलाच राहणार आहे. त्यामुळे मुंबईसह ठाण्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 5 डिसेंबर रोजी मुंबई, कोकणातल्या सागरी भागात वा-याची तीव्रता अधिक राहील. या कारणास्तव नागरिकांनी सतर्क राहावे, अशी माहितीही हवामान खात्याकडून देण्यात आली. चक्रीवादळामुळे हवामानात बदल होत असून किमान तापमानात वाढ होईल आणि थंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी, सुरक्षेची खबरदारी 5 डिसेंबरला मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन भारतीय हवामान शास्त्र विभागाने केले आहे. दरम्यान, मुंबईला ‘ओखी’चा धोका लक्षात घेत, गिरगाव चौपाटीवर जीवरक्षकांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.