Join us

अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणारी दुक्कल जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:06 AM

गुन्हे शाखेची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या महिलेसह एका इंटेरिअर ...

गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या महिलेसह एका इंटेरिअर डिझायनरला गुन्हे शाखेने अटक केली. नीलम आनंद जाधव (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, घाटकोपर परिसरात भाड्याने घेतलेल्या घरातूनच ते वेश्या व्यवसाय चालवीत होते.

घाटकोपर पश्चिमेकडील हाजी अब्दुल कादर चाळीत घर भाड्याने घेऊन एक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अल्पवयीन मुलींना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकलत असल्याची माहिती मिळताच, गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने अंधेरी येथील कलकी संस्थेच्या मदतीने शुक्रवारी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. या कारवाईत एक अल्पवयीन मुलगी आणि दोन तरुणींची सुटका करण्यात आली, तर नीलमसह शिरीषकुमार उत्तम शेडगे (३८) याला अटक करण्यात आली. दोघांकडे अधिक तपास सुरू आहे.

.....................................