Join us

पश्चिम द्रुतगती महामार्गावर जीवघेणे स्टंट करणारी दुकली अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:06 AM

वाकोला पोलिसांची कामगिरीवाकोला पोलिसांची कामगिरीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विक्रोळीत स्टंट करणाऱ्या दुकलीच्या अटके पाठोपाठ पश्चिम द्रुतगती ...

वाकोला पोलिसांची कामगिरी

वाकोला पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विक्रोळीत स्टंट करणाऱ्या दुकलीच्या अटके पाठोपाठ पश्चिम द्रुतगती महामार्गावर जीवघेणे स्टंट करणाऱ्या दुकलीलाही वाकोला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दुकलीच्या शोधासाठी अंधेरी ते माहीम परिसरातील २७हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर १४ जानेवारी रोजी

रात्री साडेदहाच्या सुमारास दोन तरुण निष्काळजीपणे वाहन चालवित कारमध्ये बसलेल्या एका महिलेसोबत असभ्य वर्तन करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच महिलेनेही याबाबत ट्वीट करत पोलिसांनाही माहिती दिली. हा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागताच कायदा व सुव्यवस्थेचे विश्वास नांगरे-पाटील यांनी तपासाचे आदेश दिले.

वाहनाला क्रमांक नसल्याने दुकलीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी अंधेरी ते माहीम येथील खासगी तसेच सरकारी अशा २७ ठिकाणांंचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.

अथक प्रयत्नानंतर सांताक्रुझ पूर्वेकडील परिसरातून चालक कुणाल सिंग (२६) आणि साथीदार रिषभ सिंग (२१ ) या दुकलीला अटक केली आहे. वाकोला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनयना नटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपीचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.