डम्पिंगच्या धुराने ठाणेकर हैराण

By admin | Published: April 12, 2016 03:18 AM2016-04-12T03:18:36+5:302016-04-12T03:18:36+5:30

मुंबईतील देवनार येथील डंम्पींगला लागलेली आगीने गेले अनेक दिवस सरकारची डोकेदुखी ठरली असतानाच सोमवारी मुलूंड येथील डम्प्ािंगच्या कचऱ्याला सोमवारी आग लागली.

Dumping dust thanesar hayran | डम्पिंगच्या धुराने ठाणेकर हैराण

डम्पिंगच्या धुराने ठाणेकर हैराण

Next

ठाणे / मुंबई : मुंबईतील देवनार येथील डंम्पींगला लागलेली आगीने गेले अनेक दिवस सरकारची डोकेदुखी ठरली असतानाच सोमवारी मुलूंड येथील डम्प्ािंगच्या कचऱ्याला सोमवारी आग लागली. यामुळे बघता बघता सगळीकडे धुराचे साम्राज्य पसरले. त्याचा सर्वाधिक त्रास मुलुंडच्या हद्दीवर असलेल्या ठाण्यातील कोपरी भागातील रहिवाशांना झाला. या धुराच्या त्रासाने उलट्या आणि चक्कर येणे असा त्रास येथील रहिवाशांना झाले. या घटनेची माहिती मिळताच ४ पाण्याचे टँकर आणि अग्निशमन दलाचे ३ बंब घटनास्थळी पोहोचले व आगीवर नियंत्रण मिळविले.
ठाण्याच्या हद्दीवरच मुंलूंड हरिओमनगर येथे हे डम्प्ािंग आहे. १५ आॅगस्ट २०१४ ला ते डम्प्ािंग ग्राऊंड केल्याचे मुंबई महापालिकेने जाहीर केले आहे. परंतु, आजही आतील भागात कचरा टाकला जात असल्याचा आरोप येथील स्थानिक रहिवासी करीत आहेत. विशेष म्हणजे हे डम्प्ािंग बंद व्हावे यासाठी वारंवार आंदोलने आणि मोर्चे काढले आहेत. त्यामुळे हे डम्प्ािंग ग्राऊंड इतरत्र हलविले जाईल, असे आश्वासनही मुंबई महापालिकेने ठाणेकरांना दिले होते. परंतु अद्यापही ते हटवण्यात आलेले नाही. त्यामुळे याचा नाहक त्रास ठाणेकरांना सहन करावा लागत असल्याचे सोमवारच्या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले.
सोमवारी सकाळी अचानक या डम्प्ािंगला आग लागली. आगीचे लोळ आणि धुराचे साम्राज्य या परिसरात पसरले होते. या धुराने लहान मुले आणि वृद्धांना त्रास होऊ लागला. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिच त्रास झाल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिली. दरम्यान आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे तीन बंब ती विझविण्याचा प्रयत्न
करीत होते. मात्र तिने उग्र स्वरूप
धारण केल्याने अग्निशमन दलाला झुंज द्यावी लागली. ती दुपारपर्यंत धुमसत होती. (प्रतिनिधी)

देवनारनंतर आता मुलुंड
देवनार डम्पिंग ग्राऊंडचे आगप्रकरण सुरु असताना सोमवारी मुलुंड पूर्व हरि ओम डम्पिंग ग्राऊंडच्या आगीची भर यात पडली. सकाळी लागलेल्या या भीषण आगीमुळे मुलुंड ते ऐरोली परीसरात धुराचे लोट पसरले. याचा फटका स्थानिकांना बसला. त्यामुळे मुलुंडच्या डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुलुंड पूर्व येथील हरि ओम डम्पिंग ग्राऊंडला सकाळी ११ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीची भीषणता इतकी होती की, पूर्व द्रुतगती मार्गावरही धुराचे लोट पसरले. कचऱ्यातील अमोनिया, मिथेन गॅस आणि वातावरणातील उष्णतेमुळे आग जास्त भडकली.

Web Title: Dumping dust thanesar hayran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.