बनावट वाहन परवाना बनविणाऱ्या दुकलीला बेड्या

By admin | Published: April 14, 2017 03:46 AM2017-04-14T03:46:05+5:302017-04-14T03:46:05+5:30

बनावट वाहन चालक परवाने बनवणाऱ्या दुकलीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. कमलेश उर्फ मुन्नासिंग गिरी (४०) आणि बाबू गुजर (५२) अशी या आरोपींची नावे

Duplicate bands that make fake auto license | बनावट वाहन परवाना बनविणाऱ्या दुकलीला बेड्या

बनावट वाहन परवाना बनविणाऱ्या दुकलीला बेड्या

Next

मुंबई : बनावट वाहन चालक परवाने बनवणाऱ्या दुकलीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. कमलेश उर्फ मुन्नासिंग गिरी (४०) आणि बाबू गुजर (५२) अशी या आरोपींची नावे असून, पोलिसांनी त्यांच्याजवळून ३५ बनावट ड्रायव्हिंग लायसन्स, १२० बनावट कोरी पीयूसी कार्ड्स, १३० बनावट कोरे वाहन परवाने आणि पत्रकार असलेली दोन कार्ड्स जप्त केली आहेत.
बनावट वाहन परवाने बनविणारी टोळी सक्रिय झाली असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष ६चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रवीण तेजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने शोध सुरू केला. त्याच दरम्यान टोळीचा एक सदस्य मंडाळा गाव प्रवेशद्वाराजवळ बनावट वाहन परवाने घेऊन येणार असल्याची माहिती मिळताच या पथकाने सापळा रचून आरोपी गुजर याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीमध्ये पोलिसांना २० बनावट वाहन परवाने आढळून आले. त्यानंतर गिरीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याजवळ १५ बनावट ड्रायव्हिंग लायसन्स
आणि पत्रकार असल्याची दोन ओळखपत्रे पोलिसांना सापडली. गिरी याच्या घरावर छापा टाकून १२० बनावट कोरी पीयूसी कार्ड्स, सोनेरी रंगाची चीप बसविलेली १३० बनावट कोरी ड्रायव्हिंग लायसन्स
आणि अर्धवट प्रिंट केलेल्या २० ड्रायव्हिंग लायसन्ससह संगणक, फोटोप्रिंटर, पेन डिझिटायझर
आणि साईनिंग पेन पोलिसांनी जप्त केले. (प्रतिनिधी)

नेरूळच्या घरातून बनावट परवाने आॅपरेट
गुजर हा गिरीच्या मदतीने नेरूळ येथील राहत्या घरी हे वाहन परवाने बनवित होता. गेल्या दीड वर्षापासून दलालांच्या मदतीने त्यांचा हा धंदा सुरू होता. त्यांच्या अन्य साथीदारांचाही शोध सुरू आहे.

फक्त फोटो दाखवून वाहन परवाना
फक्त फोटो घेऊन ही दुकली हुबेहूब दिसणारा बनावट परवाना बनवून देई. एका परवान्यासाठी २ ते ४ हजार रुपये ते उकळत होते. यावर देण्यात येणारा पत्ताही बोगस असल्याचे उघड झाले आहे.

Web Title: Duplicate bands that make fake auto license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.