मुंबई, दि. 2- मंगळवारी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचा आसनगाव-वाशिंद दरम्यान अपघात झाला होता. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी काही जण जखमी झाले. या अपघाताच्या वेळी दुरांतो एक्स्प्रेसच्या लोको पायलटने इमरजन्सी ब्रेक मारले होते. त्यावेळी लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलटने दाखविलेल्या सतर्कतेमुळे अनेकांचे जीव वाचले. विजेंद्रा सिंग (लोको पायलट), अभय कुमार पाल (असिस्टंट लोको पायलट) अशी या दोन चालकांची नाव आहेत. या दोघांचा आज रेल्वे बोर्डाकडून सत्कार करण्यात आला. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वानी यांनी विजेंद्रा सिंग आणि अभय कुमार पाल यांनी अपघाताच्या वेळी दाखविलेल्या सतर्कतेबद्दल त्यांचं कौतुक केलं. या दोघांनाही दहा हजार रूपयांचं बक्षीस देऊन त्यांनी केलेल्या कामाला प्रोत्साहन देण्यात आलं.
मंगळवारी पहाटे साडेसहाच्या दरम्यान आसनगाव आणि वाशिंद स्टेशनदरम्यान दुरांतो एक्स्प्रेसचं इंजिन आणि मागचे सात डबे घसरले आणि एकच खळबळ उडाली. मुसळधार पावसामुळे मातीचा ढीग ट्रॅकवर आल्याचं लक्षात येताच, लोको पायलटनं इमर्जन्सी ब्रेक लावला होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती, पण डबे ट्रॅकवरून खाली उतरले होते
४९३ प्रवाशांचा जीव आला असता धोक्यातदुरांतोच्या अपघातात या गाडीचे आठ कोच रुळाखाली घसरले. गाडीचा वेग कमी असल्यामुळे या कोचला अपघात झाला नाही नाहीतर ४९३ प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण झाला असता. रुळावरून घसरलेल्या कोचमध्ये एच १ या कोचमध्ये २३ प्रवासी, ए १ या कोचमध्ये ५२, ए २ कोचमध्ये ५२, ए ३ कोचमध्ये ५२, बी १ या कोचमध्ये ७४, बी २ कोचमध्ये ८०, बी ३ कोचमध्ये ८० आणि बी ४ या कोचमध्ये ८० असे एकूण ४९३ प्रवासी होते. रुळावरून घसरून हे कोच न उलटल्यामुळे या प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.
भीषण संकट टळले‘सर्व प्रवासी झोपेत होते. आसनगाव स्टेशनच्या पुढे जोरात झटका बसला. बर्थवरील काही प्रवासी धक्का दिल्यासारखे खाली पडले. एकच आरडाओरड झाली. गाडी अचानक थांबली आणि कुणालाच काही सुचले नाही. काही लोकांनी खिडकीतून बाहेर डोकावले असता गाडीच्या इंजिनला लागून असलेले डबे रुळाखाली घसरले होते. १५ मिनिटातच रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेची भीषणता लक्षात घेता मोठा घातपात झाल्याचे दिसत होते. परंतु कुणालाही यात मोठी दुखापत झाली नाही. गाडीचा वेग कमी असल्यामुळे प्रवाशांवर आलेले भीषण संकट टळले, अशी माहिती पत्रकार जस्टीन राव यांनी दिली.