Join us

दुरांतो एक्स्प्रेस बोरीवली येथे थांबवावी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथून सुटणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसला बोरीवली येथे थांबा द्यावा, कोकणात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथून सुटणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसला बोरीवली येथे थांबा द्यावा, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकडे आवर्जून लक्ष देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सुधीर परांजपे यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांच्याकडे केली.

या ठिकाणी ये-जा करणाऱ्या सर्वच प्रकारच्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्याचबरोबर येथील नागरिकांना सुद्धा दिलासा मिळेल, अशा पद्धतीने रेल्वे प्रशासन यथायोग्य प्रयत्न करील, असे सुस्पष्ट आश्वासन आलोक कंसल यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले.

या भेटीदरम्यान कोकणातील नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून बोरीवली -वसई-दिवा मार्गाने फक्त सणासुदीलाच नव्हे तर कायमस्वरूपी कोकणवासीयांसाठी रेल्वे सेवा सुरू करावी, सद्य:स्थितीत बोरीवली व मालाड रेल्वेस्थानकांवर नव्याने बांधण्यात आलेले उद्वाहक (लिफ्ट) आणि सरकते जिने (एस्कलेटर) व स्त्रियांसाठी फलाट क्र. १० वर बनविलेले शौचालय तातडीने सुरू करण्याची विनंती करण्यात आली. बोरीवली पूर्व येथे रेल्वेस्थानकाच्या बाहेर सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचा महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी निश्चित विचार करून त्या लवकरात लवकर सोडवल्या जातील, असे आश्वासन दिल्याचे

आणि अत्यंत सकारात्मक झाल्या बद्दल मयूर ओव्हरसिअर व सुधीर परांजपे यांनी समाधान व्यक्त केले. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट घेण्यात आली.