मुंबईत रुग्णदुपटीचा काळ ३५९ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:13 AM2021-01-13T04:13:50+5:302021-01-13T04:13:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत आतापर्यंत २ लाख ९९ हजार ३२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे शहर, उपनगरात रुग्ण ...

The duration of double sickness in Mumbai is 359 days | मुंबईत रुग्णदुपटीचा काळ ३५९ दिवसांवर

मुंबईत रुग्णदुपटीचा काळ ३५९ दिवसांवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत आतापर्यंत २ लाख ९९ हजार ३२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे शहर, उपनगरात रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी ३५९ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ७ हजार ३६४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत २५ लाख ४ हजार ९७१ चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात काेराेनाचे ४३४ रुग्ण आणि ९ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची एकूण संख्या २ लाख ७९ हजार ८८२ झाली असून मृतांचा आकडा ११,१९५ झाला आहे.

मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या १७१ असून २ हजार ३७२ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने २ हजार ३४० अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला.

........................................

Web Title: The duration of double sickness in Mumbai is 359 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.