Join us

मुंबईत रुग्णदुपटीचा काळ ३५९ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:13 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत आतापर्यंत २ लाख ९९ हजार ३२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे शहर, उपनगरात रुग्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत आतापर्यंत २ लाख ९९ हजार ३२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे शहर, उपनगरात रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी ३५९ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ७ हजार ३६४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत २५ लाख ४ हजार ९७१ चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात काेराेनाचे ४३४ रुग्ण आणि ९ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची एकूण संख्या २ लाख ७९ हजार ८८२ झाली असून मृतांचा आकडा ११,१९५ झाला आहे.

मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या १७१ असून २ हजार ३७२ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने २ हजार ३४० अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला.

........................................