मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १२३ दिवसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:06 AM2021-05-06T04:06:36+5:302021-05-06T04:06:36+5:30
मुंबई : मुंबईत रुग्ण दुप्पटीचा कालावधी १२३ दिवसांवर गेला असून, दिवसभरात ३,८७९ नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत, तर ७७ ...
मुंबई : मुंबईत रुग्ण दुप्पटीचा कालावधी १२३ दिवसांवर गेला असून, दिवसभरात ३,८७९ नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत, तर ७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३,६८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ६ लाख ६४ हजार २९९ वर पोहोचला आहे, मृतांचा एकूण आकडा १३ हजार ५४७ वर पोहोचला आहे.
मुंबईत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ५ लाख ९८ हजार ५४५ वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या ५१,४७२ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के आहे. २८ एप्रिल ते ४ मेपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.५४ टक्के असल्याची नोंद आहे.
मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या १०२ चाळी आणि झोपडपट्ट्या प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत, तर ७२८ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात३५ हजार ३७७, तर आतापर्यंत एकूण ५५ लाख ७८ हजार २३६ चाचण्या करण्यात आल्या आहेत.