मुंबई : मुंबईत गुरुवारी दिवसभरात ८ हजार ९३८ रुग्ण आणि २३ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, शहर उपनगरात कोरोना बाधितांची एकूण संख्या ४ लाख ९१ हजार ६९८ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ८७४ झाला आहे.
शहर उपनगरात दिवसभरात ४ हजार ५०३ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ३ लाख ९२ हजार ५१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहर उपनगरात बरे होण्याचा दर ८० टक्क्यांवर पोहोचला आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३३ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ८६ हजार २७९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहर उपनगरात १ ते ७ एप्रिल या कालावधीत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर २.०३ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत दिवसभरात ४८ हजार ९०२ कोरोनाच्या आतापर्यंत ४४ लाख ५४ हजार १४० चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या ७१ असून, ७५० सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने ३९ हजार २७० अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला आहे.