Join us

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३४८ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:06 AM

मुंबई - मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३४८ दिवसांवर आला आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांची संख्याच जास्त आहे. ...

मुंबई - मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३४८ दिवसांवर आला आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांची संख्याच जास्त आहे. मुंबईत दिवसभरात १ हजार ३६२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत आतापर्यंत नोंद झालेल्या रुग्णांची संख्या ७ लाख १ हजार २६६ वर गेली आहे. मुंबईचा रुग्ण बरे होण्याचा दर ९४ टक्के इतका आहे. मुंबईत दिवसभरात १ हजार २१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहर व उपनगरांत सध्या २७ हजार ९४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून मृत्यूच्या आकड्यांतही चढउतार पाहायला मिळत आहेत. मुंबईत दिवसभरात ३४ जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. मंगळवार (दि. २५) च्या तुलनेत दिवसभरात काही अंशांनी ही संख्या कमी झाली आहे. मात्र ही संख्या सातत्याने कमी होणे महत्त्वाचे आहे. मुंबईत आतापर्यंत १४ हजार ७४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईचा १९ मे ते २५ मे दरम्यान विचार केला असता, मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर हा ०.१९ टक्के इतका आहे. सध्या मुंबईतील सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या कमी होऊन २०० वर आली आहे; तर केवळ ४४ सक्रिय कंटेन्मेंट झोन मुंबईत आहेत.